अनेकदा तरुणांची तक्रार असते की, आमची कमाई रुपयात असते. जर ती डॉलरमध्ये असेल तर खूपच चांगली असेल. कारण की, रुपयाच्या तुलनेने डॉलर फारच महाग आहे. पण काही देशामध्ये तुमची रुपयातील कमाई तुम्हाला ही फारच जास्त वाटू शकते. पाहा कोणते आहेत ते देश
2/8
त्यामुळे रुपयातील कमाईमध्येही तुम्ही बरीच मजा करु शकता.
3/8
व्हिएतनाम: हा एक असा देश आहे जिथे अवघ्या 700 रुपयात तुम्ही राहणं, खाणं आणि फिरणं हे सारं काही करु शकता. व्हिएतनामचं चलन हे डॉन्ग आहे आणि 1 रुपया म्हणजे 338.35 डॉन्ग आहे.
4/8
कंबोडिया: रियाल हे इथलं चलन आहे. 1 रुपया म्हणजे 63.93 रियाल होय. इथं राहणं, खाणं फारच स्वस्त आहे. कंबोडियातील अंकोरवाटचं मंदिर हे जगातील सर्वात मोठं मंदिर परिसर सर्वात मोठं धार्मिक स्थळ आहे.
5/8
बेलारुस: रुबल हे बेलारुसचं चलन आहे. तुमचा 1 रुपया म्हणजे 216 बेलारुस आहे. सुंदर म्युझियम, शानदार कॅफे असं बरंच काही या देशात तुम्हाला पाहायला मिळू शकतं. जर तुम्ही पूर्व युरोपातील कोणत्या सुंदर देश कमी पैशात पाहायचा असेल तर बेलारुस हा चांगला पर्याय आहे.
6/8
कोस्टा रिका: कोस्टा रिकाचं चलन हे कोलन आहे. 1 रुपया म्हणजेच 8.5 कोलन आहे. कोस्टा रिकामध्ये निसर्गानं मुक्तहस्ते उधळण केली असून इथं एकदा तरी भेट द्यायलाच हवी. बीच आणि हिरवाईनं नटलेला परिसर तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल.
7/8
झिम्बाब्वे: 1 रुपया झिम्बाब्वेच्या 5.58 डॉलर एवढ्या किंमतीचा आहे. येथे खाणं आणि राहणं फारच स्वस्त आहे.
8/8
पॅराग्वे: पॅराग्वेचं चलन ग्वारानी आहे. 1 ग्वारानीची किंमत ही 0.014 आहे. म्हणजेच 1 रुपयात तुम्हाला 74.26 ग्वारानी मिळतील. एका सर्व्हेनुसार, पॅराग्वे हा जगातील सर्वात स्वस्त देश आहे. जिथे खाणं-पिणं, राहणं फारच स्वस्त आहे.