रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी मोबाईल क्षेत्रातल्या या दिग्गज कंपन्या एकवटल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी व्होडाफोनने आपल्या 4G इंटरनेट सेवा आणि कॉलिंगच्या दरात मोठी कपात केली होती. यानंतर या दोन कंपन्यांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
2/8
या बदलामुळे मोबाईल कंपन्यांमध्ये नव्याने कॉलदर युद्ध सुरू होऊन ग्राहकांना फायदा होणार, की कंपन्या आपापसात तडजोड करून हे युद्धच संपवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
3/8
आयडिया आणि व्होडाफोनच्या विलिनीकरणामुळे 25 ते 30 हजार कर्मचाऱ्यांना रोजगाराला मुकावं लागू शकतं. सध्या दूरसंचार क्षेत्रात 3 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत.
4/8
दोन्ही कंपन्यांना विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सेबी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि दूरसंचार विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच दोन्ही कंपन्या एकत्र येऊ शकतील.
5/8
आयडिया आणि व्होडाफोन या देशातल्या दिग्गज मोबाईल सेल्युलर कंपन्यांचं लवकरच विलिनीकरण होणार आहे. या विलिनीकरणानंतर स्थापन झालेली नवीन कंपनी ही देशातली सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी असेल.
6/8
कुमारमंगलम् बिर्ला कंपनीचे नवे चेअरमन होण्याची शक्यता आहे. तर नव्या कंपनीचा सीईओ आयडियाचा आणि सीएफओ व्होडाफोनचा
7/8
नवीन स्थापन होणाऱ्या कंपनीत व्होडाफोनची 45.1 टक्के भागीदारी असेल तर आयडियाची 26 टक्के भागीदारी असणार आहे. उर्वरित 35 टक्के बाजारातले इतर भागीदार असतील.
8/8
आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने ही घोषणा केली आहे. या विलिनीकरणानंतर स्थापन होणाऱ्या कंपनीत तब्बल 40 कोटी ग्राहक असणार आहेत.