एक्स्प्लोर
बीसीसीआयकडून पुलवामामधील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

1/9

पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना बीसीसीआय पाच कोटी रुपये मदत करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
2/9

त्यांनी राज्य असोसिएशन आणि आयपीएल फ्रेंचाइजीसना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
3/9

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी सीओए चीफ विनोद राय यांच्याकडे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रुपये मदत करण्याची अपील केली आहे.
4/9

शिवाय त्यांनी जवानांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रुपयांची मदत करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
5/9

सी.के खन्ना यांनी सीओए यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे की, आम्ही पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दुखात सामिल आहोत.
6/9

इराणी करंडकातल्या विजयासाठी मिळालेली इनामाची सारी रक्कम, आपण पुलवामात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियाच्या निधीला देत असल्याची घोषणा विदर्भाचा कर्णधार फैझ फझलनं केली आहे.
7/9

यापूर्वी भारतीय टीमचा माजी सलामीचा फलंदाज विरेंद्र सेहवाग याने शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
8/9

या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने स्विकारली होती.
9/9

हा हल्ला श्रीनगरपासून 30 किमी लांब लेथपोरा भागात झाला होता. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.
Published at : 17 Feb 2019 02:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
