एक्स्प्लोर
140 कोटींचा देश, नरेंद्र मोदी स्टेडियमकडे लक्ष, फायनलसाठी अहमदाबादेत किती गर्दी?, 10 PHOTO बघा!
वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी उरले अवघे काही तास उरले आहेत. टीम इंडिया अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

ICC World cup 2023
1/10

अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम परिसरात आत जाण्यासाठी सुरुवात झाली आहे.
2/10

प्रेक्षकांकडून रांगा लावत पोलिसांकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे.
3/10

तसंच प्रतिबंधित वस्तूंना आत नेण्यास मनाई आहे. तर खासगी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून कसून तपासणी केली जातेय.
4/10

आज या स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार क्रिकेट चाहत्यांची गर्दी होणार आहे.
5/10

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानावर प्रेक्षकांमध्ये सहभागी होणार आहेत.
6/10

नरेंद्र मोदी स्टेडियम विश्वातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 132000 प्रेक्षक सामना पाहू शकणार आहेत.
7/10

ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (Melbourne Cricket Ground, Australia) हे जगातील सर्वात मोठे मैदान होते, पण आता या स्टेडियमने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला मागे टाकलं आहे.
8/10

मैदान सुमारे 63 एकरमध्ये पसरलेले आहे, याला 4 गेट आहेत.
9/10

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 4 ड्रेसिंग रूम आहेत. क्रिकेट स्टेडियममध्ये साधारणपणे दोन ड्रेसिंग रूम असतात.
10/10

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सरावासाठी 6 इनडोअर खेळपट्ट्या आहेत, तर 3 मैदानी खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत.
Published at : 19 Nov 2023 12:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
भारत
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
