सोशल मीडियावर या जोडीनं नव्या नात्याची सुरुवात केल्याचं कळताच त्यांच्यावर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. (छाया सौजन्य- cupcakeproductions13)
3/8
या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या विवाहसोहळा आणि संगीत सोहळ्यातील काही फोटो शेअर केले. (छाया सौजन्य- cupcakeproductions13)
4/8
फक्त भारतातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावरील बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू म्हणून पंकजची ओळख आहे. (छाया सौजन्य- cupcakeproductions13)
5/8
मुंबईत पार पडलेल्या विवाहसोहळ्यादरम्यान दोघंही एकमेकांना शोभून दिसत होते. संगीत सोहळ्यासाठी जिथं या सेलिब्रिटी जोडीनं गडद रंगाच्या वेषभूषेला प्राधान्य दिलं, तिथेच मुख्य विवाहसोहळ्यातील विधिंसाठी मात्र त्यांनी हलक्या आणि तितक्याच मोहक रंगांची निवड केली होती. (छाया सौजन्य- cupcakeproductions13)
6/8
पंकजची वेगळी अशी ओळख असतानाच त्यांची पत्नीसुद्धा तितकीत नावाजलेली मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट आहे. कलाविश्वात त्यांच्या नावाला वजन प्राप्त आहे. (छाया सौजन्य- cupcakeproductions13)
7/8
सेलिब्रिटी वर्तुळापासून ते अगदी तुमच्या आमच्या पर्यंत सगळ्यांकडेच एखादं तरी शुभकार्य पार पडलंच. अशाच या आनंदी आणि सकारात्मक वातावरणात एक बहुचर्चित विवाहसोहळा नुकताच पार पडला. हा विवाहसोहळा आहे, जागतिक स्तरावर नावाजलेल्या बिलियर्ड्स चॅम्पियन पंकज अडवाणी (Pankaj Advani) आणि सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सानिया शददपुरी (Saniya Shadadpuri) यांचा. (छाया सौजन्य- cupcakeproductions13)
8/8
कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आल्यानंतर तणावाचं आणि नकारात्मक वातावरण हलकं झालं आणि अनेक ठिकाणी सुरुवात झाली, ती म्हणजे लग्नसराईला, शुभकार्याला. (छाया सौजन्य- cupcakeproductions13)