एक्स्प्लोर
Virat Kohli Birthday: विराट कोहली 18 नंबरचीच जर्सी का घालतो? 'हे' आहे कारण
Virat Kohli Jersey Number: प्रत्येक खेळाडूच्या जर्सी नंबर मागे एक कहाणी असते. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू असलेला विराट कोहली नेहमी 18 नंबरची जर्सी घालतो, पण तुम्हाला यामागील कारण माहीत आहे का?

Virat Kohli Jersey Number 18
1/16

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली सध्या जगातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. 2008 मध्ये भारताकडून पदार्पण करणाऱ्या विराटच्या बॅटने नेहमीच धावांचा पाऊस पडतो. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. केवळ 5 फलंदाज विराटच्या पुढे आहेत.
2/16

जर्सी नंबर 18 चा उल्लेख केल्यावर लगेचच विराट कोहली मनात येतो. विराट कोहली नेहमी 18 नंबरचीच जर्सी घालतो.
3/16

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला, त्यावेळीही कोहलीने 18 नंबरची जर्सी घातली होती.
4/16

खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचा आवडता क्रमांक किंवा जन्मतारीख लिहिलेली पाहायला मिळते. पण विराट कोहलीच्या बाबतीत असं नाही. मग नेमकं विराट कोहलीच्या 18 नंबर जर्सीमागचं कारण काय?
5/16

किंग कोहली प्रत्येक वेळी मैदानात उतरताना 18 नंबरची जर्सी का घालतो? यामागचं रहस्य आता उघड झालं आहे. खरं तर कोहलीने या क्रमांकाची जर्सी घालण्यामागे एक भावनिक कारण आहे.
6/16

कोहलीने भारतीय संघात प्रवेश केला तेव्हा इतर कोणत्याही खेळाडूकडे 18 क्रमांकाची जर्सी नव्हती, त्यामुळे कोहलीला त्या क्रमांकाची जर्सी मिळवणं अवघड नव्हतं.
7/16

खरं तर, विराट कोहलीने 18 नंबरची जर्सी घालण्याचं कारण म्हणजे 18 डिसेंबर 2006 रोजी कोहलीच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या स्मरणार्थ कोहली 18 नंबरची जर्सी घालतो.
8/16

वडिलांचं निधन झालं त्यावेळी विराट कोहली केवळ 17 वर्षांचा होता, त्यावेळी तो दिल्लीकडून कर्नाटकविरुद्ध रणजी खेळत होता. मात्र वडिलांच्या निधनानंतरही कोहलीने व्यावसायिकता दाखवली आणि दुसऱ्याच दिवशी रणजी सामना खेळण्याचा निर्णय घेतला.
9/16

आई आणि प्रशिक्षकांशी चर्चा करून सामना खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या कोहलीने त्या सामन्यात 90 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला फॉलोऑन टाळता आला. यानंतर त्याने घरी जाऊन वडिलांवर अंत्यसंस्कार केले.
10/16

विराटच्या वडिलांची इच्छा होती की त्याने एक दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावं. विराटने 2008 मध्ये भारतासाठी पदार्पण केलं आणि वडिलांच्या स्मरणार्थ तो नेहमी 18 क्रमांकाची जर्सी घालतो.
11/16

तेव्हाच्या परिस्थितीबद्दल बोलताना कोहली म्हणाला, “त्या रात्री माझ्या वडिलांचं निधन झालं. पण माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला साहजिकच रणजी खेळण्याचा फोन आला. मी सकाळी माझ्या (दिल्ली) प्रशिक्षकाला फोन केला आणि आजच्या सामन्यात खेळणार असल्याचं सांगितलं. कारण माझ्या आयुष्यात या खेळाचं महत्त्व खूप होतं."
12/16

भारतीय क्रिकेट संघातील या दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार असलेल्या विराटचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ ला दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला.
13/16

वडील प्रेम कोहली हे एक क्रिमिनल लॉयर होते तर आई सरोज कोहली या गृहिणी होत्या.
14/16

विराटच्या मोठ्या भावाचं नाव विकास आणि मोठ्या बहिणीचं नाव भावना आहे. विराट कोहली उत्तम नगर, दिल्लीत लहानाचा मोठा झाला.
15/16

विराट अवघ्या तीन वर्षांचा होता अगदी तेव्हापासून त्याला क्रिकेटची आवड होती. तो जसजसा मोठा होत गेला, क्रिकेटची त्याची आवड वाढत गेली
16/16

विराटच्या वडिलांनी त्याचा क्रिकेटकडचा कल ओळखला आणि वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षापासून त्यांनी विराटला क्रिकेट क्लबमधे पाठवण्यास सुरुवात केली.
Published at : 05 Nov 2023 12:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
