एक्स्प्लोर
Vipraj Nigam : केएल राहुलनं दिल्लीला मॅच जिंकवली पण खरी मॅच फिरवली नवख्या विपराजनं, आक्रमक सॉल्ट अन् विराटच्या विकेटनं आरसीबीचे मनसुबे धुळीस मिळवले
IPL 2025 : आयपीएलमध्ये आज झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं आरसीबीला पराभूत केलं. दिल्लीच्या या विजयात नवख्या विपराज निगमची कामगिरी लक्षवेधी ठरली.
विपराज निगम विराट कोहली
1/5

आयपीएलमध्ये आज झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6 विकेटनं पराभूत केलं. यामध्ये भारताचा दिग्गज खेळाडू केएल राहुल याच्या 93 आणि ट्रिस्टन स्टब्सची 38 धावांची खेळी महत्त्वाची ठरली.
2/5

आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 बाद 163 धावा केल्या होत्या. दिल्लीचा अनुभवी गोलंदाज मिशेल स्टार्कची फिल सॉल्टनं धुलाई केली होती. त्याला धावबाद करण्यात विपराज निगमची भूमिका महत्त्वाची ठरली.
3/5

फिल सॉल्टला 37 धावांवर धावबाद केल्यानंतर विपराज निगमचा आत्मविश्वास वाढला. विपराचनं एकूण 4 ओव्हर गोलंदाजी केली. यात त्यानं विराट कोहली आणि कृणाल पांड्याला बाद केलं.
4/5

आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला विपराज निगमनं बाद केलं. विराट कोहलीनं ज्या ओव्हरमध्ये षटकार मारला त्याच्याच शेवटच्या बॉलवर त्यानं विराटला बाद केलं.
5/5

विपराज निगमनं उत्तर प्रदेश टी 20 स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. त्यानं 2024 च्या हंगामात त्यानं 11 मॅचमध्ये 20 विकेट घेतल्या आहेत. तो चांगली फलंदाजी देखील करु शकतो. आज त्यानं चांगली गोलंदाजी करत दिल्लीच्या विजयात महत्त्वाचा हातभार लावला.
Published at : 10 Apr 2025 11:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
नवी मुंबई
























