एक्स्प्लोर

नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम

शेकडो स्वयंसेवकांना प्रवासी बनवून पूर्ण प्रक्रियेचे सिम्युलेशन करण्यात आले. यात चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेमपर्यंत सर्व टप्प्यांची काटेकोर तपासणी करण्यात आली.

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते लोकार्पण झालेल्या नवी मुंबईतील (Navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 डिसेंबर रोजी पहिले प्रवाशी विमान उडणार आहे. या दृष्टीने विमानतळ प्रशासनाने 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी पहिली प्रवासी चाचणी (Passenger Simulation Test) यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यामुळे, 25 डिसेंबरपासून विमानतळावर (Airport) नियमित उड्डाणांना सुरुवात होणार आहे. या उड्डाणाच्या दृष्टीने ही चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकप्रकारे हे विमान प्रवासाचे मॉकड्रीलच होतं असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

शेकडो स्वयंसेवकांना प्रवासी बनवून पूर्ण प्रक्रियेचे सिम्युलेशन करण्यात आले. यात चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेमपर्यंत सर्व टप्प्यांची काटेकोर तपासणी करण्यात आली. इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांनी या ट्रायलमध्ये सहभाग घेतला होता. 19,650 कोटी रुपयांच्या खर्चाने विकसित करण्यात आलेलं हे देशातील सर्वात मोठं ग्रीनफिल्ड विमानतळ ठरणार आहे. मुंबईतील CSMIA विमानतळावरील वाढत्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यास NMIA महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे, आता 25 डिसेंबर रोजी येथून पहिलं विमान कोणत्या शहरासाठी, देशासाठी उड्डाण करतं आणि त्यातील प्रवासी कोण राहतील, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

नवी मुंबईतून पहिल्या उड्डाणासाठीचे बुकींग यापूर्वीच सुरू झाले असून इंडिगोचे भाडे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा अधिक, तर अकासा एअरचे भाडे त्याउलट कमी असल्याचं समोर आलं होतं. अकासा एअरनंतर इंडिगोकडूनही नवी मुंबईवरुन उड्डाणांची नोंदणी सुरू केल्याची माहिती आहे. इंडिगोकडून नवी मुंबईवरून 10 भारतीय शहरांसाठी उड्डाणांची सुविधा उपलब्ध तर अकासाकडून दिल्ली, कोच्ची, गोवा आणि अहमदाबादसाठी सेवा नियमितसुरू राहणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी झाले होते. उद्घाटनानंतर केवळ दोन महिन्यांत विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेसाठी सज्ज झाले आहे. 

नवी मुंबईवरुन विमान भाडे - 25 डिसेंबरसाठी 

दिल्लीसाठी - 
इंडिगो - ६ हजार २७४ रुपये 
अकासा - ५ हजार ७७६ रुपये 

नागपूरसाठी - 
इंडिगो - ७ हजार २६७ रुपये 

कोच्चीसाठी - 
इंडिगो - ९ हजार ११६ रुपये 
अकासा - ७ हजार ३७३ रुपये 

मुंबई विमानतळावरुन विमान भाडे - २६ डिसेंबरसाठी 
दिल्लीसाठी - 
इंडिगो - ६ हजार ११६ रुपये 
अकासा - ५ हजार ७७६ रुपये 

नागपूरसाठी - 
इंडिगो - ५ हजार ७४४ रुपये 

कोच्चीसाठी - 
इंडिगो - १५ हजार ४३४ रुपये 
अकासा - २४ हजार १६० रुपये

हेही वाचा

आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
Embed widget