एक्स्प्लोर
Shivam Dube : शिवम दुबेनं सामाजिक बांधिलकी जपली, टेनिस, बुद्धिबळ यासह विविध खेळातील 10 युवा खेळाडूंना आर्थिक मदत करणार
Shivam Dube : टीम इंडियाचा खेळाडू शिवम दुबेनं मोठी घोषणा केली आहे. तामिळनाडूच्या 10 खेळाडूंना आर्थिक मदतीची घोषणा त्यानं केलीय.
शिवम दुबेचा मोठा निर्णय
1/5

टीम इंडियाचा युवा खेळाडू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिवम दुबेनं मोठा निर्णय घेतला आहे.
2/5

शिवम दुबे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईच्या क्रिकेट टीमकडून खेळतो. शिवम दुबे यानं स्वत:च्या कमाईतून युवा खेळाडूंच्या भविष्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
3/5

शिवम दुबे सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतोय. शिवम दुबेनं तामिळनाडूच्या 10 युवा खेळाडूंना प्रत्येकी 70 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
4/5

शिवम दुबे यानं तामिळनाडू स्पोर्टस जर्नालिस्ट असोसिएशनच्या वार्षिक पुरस्कार आणि स्कॉलरशिप सोहळ्यात बोलताना ही घोषणा केली. शिवम दुबे प्रत्येकी 70 हजारांची मदत 10 खेळाडूंना करेल. टीएनएसजेएकडून या 10 खेळाडूंना 30 हजार रुपयांची मदत करेल. म्हणजे त्या खेळाडूंना 1 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल.
5/5

शिवम दुबेनं ज्या खेळाडूंना मदत करण्याचा निर्णय घेतला ते टेबल टेनिस, आर्चरी, पॅरा अॅथलिटस, स्क्वाश, क्रिकेट, क्रिकेट, सर्फिंग, अॅथलिटस, बुद्धिबळ हे खेळ खेळतात. पीबी अभिनंध (टेनिस), केएस व्हेनिसा श्री (आर्चरी), मुथुमीना वेल्लासामी (पॅरा अॅथलिटस), शमीना रियाझ (स्क्वाश), जयंत आरके (क्रिकेट), एस. नंधना (क्रिकेट), कमाली (सर्फिंग), आर. अभिन्या, आसी जिथीन अर्जुनन (अॅथलिटस), ए टक्कशांथ (बुद्धिबळ)
Published at : 22 Apr 2025 06:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























