एक्स्प्लोर

Gautam Gambhir Ind Vs SA: मीच तो ज्याने इंग्लंडमध्ये तरुण संघ घेऊन विजय मिळवला, मीच तो ज्याच्या मार्गदर्शनात भारताने आशिया कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली; गौतम गंभीरने पराभवानंतर टीकाकारांना सुनावलं

Gautam Gambhir On Team India defeat: गौतम गंभीर प्रशिक्षक असताना टीम इंडियाला न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे गंभीरच्या प्रशिक्षकपदाबाबत शंका

Gautam Gambhir Ind Vs SA: गुवाहाटी येथील कसोटी सामन्यात बुधवारी टेम्बा बवुमाच्या नेतृत्त्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडिया अक्षरश: धूळ चारली. दक्षिण आफ्रिकेने (Ind Vs SA test) या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 408 धावांनी पराभव केला. हा भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात दारुण पराभव ठरला. टीम इंडियाचे कागदावर एकाहून एक मोठे वाटणारे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) गोलंदाजांसमोर टिकावच धरु शकले नाहीत. या पराभवामुळे टीम इंडियाच्या कसोटी क्रिकेटमधील मर्यादा उघड्या पडल्या आहेत.

दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला आहे. या पराभवाचे खापर आता भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्यावर फोडले जात आहे. गेल्या काही काळापासून गौतम गंभीरने विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारख्या कारकीर्दीच्या उतरणीला असलेल्या पण अनुभवी खेळाडूंना पूर्णपणे बाजूला ठेवून तरुण खेळाडूंचा संघ उभारण्याची मोहीम सुरु केली आहे. 2027 सालच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी तरुण खेळाडू संघात असणे आवश्यक आहे, अशी गौतम गंभीरची ठाम भूमिका आहे. याशिवाय, गौतम गंभीरकडून टीम इंडियातील (Team India) फलंदाजांबाबत सातत्याने वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. प्रमुख फलंदाजांच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. हे अतिप्रयोगाचे धोरण टीम इंडियासाठी मारक ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे. गंभीरच्या या बेधडक निर्णयांमुळेच भारतीय संघाची घडी विस्कटल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे साहजिकच काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर  गौतम गंभीर याच्यावर माजी क्रिकेटपटू आणि क्रीडारसिकांनी टीकेची झोड उठवली आहे.

या पार्श्वभूमीवर काल सामना संपल्यानंतर भारतीय संघाची पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी गौतमी गंभीरला भारतीय संघाच्या अपयशावरुन काही बोचरे प्रश्न विचारले. तेव्हा गौतमी गंभीरने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत पत्रकारांना प्रत्युत्तर दिले. त्याने म्हटले की, 'लोक हे विसरतात की मी तो आहे, ज्याने इंग्लंडमध्ये भारताचा तरुण संघ असतानाही यश मिळवून दिलं. मात्र, या गोष्टी तुम्ही लवकरच विसरुन जाल. अनेकजण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेबाबत बोलत राहता. मात्र, मी तोच माणूस आहे ज्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे', असे उत्तर गौतम गंभीर याने दिले.

आणखी वाचा

पराभव होताच गौतम गंभीरला चाहत्यांनी मैदानात घेरलं; हाय... हायचे नारे; टीम इंडियाचे खेळाडू आले धावून, मोहम्मद सिराजने जे केलं...

महत्त्वाच्या बातम्या

ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Embed widget