Suraj Chavan Fiance Sanjana Dance Video: सूरज चव्हाणची लगीनघाई, दणक्यात झाला घाणा भरण्याचा कार्यक्रम, होणाऱ्या बायकोचा भन्नाट डान्स होतोय VIRAL
Suraj Chavan Fiance Sanjana Dance Video: सूरज चव्हाण आणि संजनाच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली असून सध्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Suraj Chavan Fiance Sanjana Dance Video: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता झापूक झुपूक स्टार सूरज चव्हाणची (Suraj Chavan) सध्या लग्नसराई सुरू आहे. 29 नोव्हेंबरला सूरज चव्हाण आपल्या मामाची मुलगी संजना (Sanjana) हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. सूरजचं नवं घर बांधून तयार असून आता लग्नानंतर सूरज चव्हाण आपल्या अलिशान घरात बायकोसोबत संसार थाटणार आहे. आता सूरज आणि संजनाच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली असून सध्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण आणि संजनाची सध्या लगीनघाई (Suraj Chavan Wedding Rituals) सुरू आहे. लग्न ठरल्यापासूनच सूरज आणि संजनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यावेळी, सूरजची होणारी बायको कोण? याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली. त्यानंतर कोकण हार्टेड गर्लनं सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोची सर्वांना ओळख करुन दिलेली. त्यानंतर तिनं दोघांचं केळवण केलं असून दोघांना खरेदीसाठीही मदत केलेली. सोशल मीडियावर सूरज, संजनाच्या केळवणाचे आणि शॉपिंगचे व्हिडीओ व्हायरल झालेले. अशातच आता दोघांची लग्नसराई सुरू झाली असून लग्नापूर्वीच्या सोहळ्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ सूरजची होणारी बायको संजनाच्या घरच्या कार्यक्रमाचा आहे. संजनाच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याच सोहळ्याचा हा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमात तिनं धमाल डान्ससुद्धा केलाय. या डान्सच्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
घाण्याच्या कार्यक्रमासाठी संजनाचा साज
घाण्याच्या कार्यक्रमावेळी संजनानं दणक्यात ठेका धरलेला. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. घाणा भरण्याच्या कार्यक्रमासाठी संजनानं हिरव्या रंगाची साडी नेसलेली. त्यासोबत तिनं पारंपरिक दागिने परिधान केलेले. तसेच, केसात गजरा माळलेला. आपल्या लग्नापूर्वीच्या घाणा भरण्याच्या कार्यक्रमासाठी संजनान सुंदर साजश्रृंगार केलेला.
संजना, सूरजचं लव्ह मॅरेज
गुलिगत स्टार सूरज चव्हाणचं लव्ह मॅरेज आहे. आपल्या चुलत मामाच्या मुलीशीच सूरज लग्नगाठ बांधणार आहे. दोघेही पुण्यातील सासवडमध्ये आपली लग्नगाठ बांधणार आहे. सूरजंने बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व गाजवलं होतं. या शोचं विजेतेपद पटकावल्यानंतर तो 'झापुक झुपूक' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. त्यानंतर सूरजला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नवं घर बांधून देण्याचं वचन दिलेलं. अजितदादांनी सूरजला दिलेला शब्द पूर्ण केला आणि त्याला पत्राच्या घरातून थेट अलिशान महालासारखं घर बांधून दिलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























