एक्स्प्लोर
IPL 2022 : राजस्थानची फायनलमध्ये धडक, सामन्यातील रोमांचक क्षण एका क्लिकवर
IPL 2022
1/10

बटलरने आरसीबीचा पत्ता केला कट
2/10

जोस बटलरने यंदाच्या हंगामातील चौथं शतक झळकावलेय. बटलरने 59 चेंडूत शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या एकाच हंगामात चार शतकं झळकावण्याचा विक्रमाची बटलरने बरोबरी केली आहे. जोस बटलर यंदाच्या हंगामात 800 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरलाय.
3/10

158 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामी फलंदाजांनी विस्फोटक सुरुवात केली. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी 5 षटकात 61 धावांची सलामी दिली.
4/10

यशस्वी जायस्वालने 13 चेंडूत 21 धावांची खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसनने 21 चेंडूत 23 धावांची छोटेखानी खेळी केली. पडिक्कलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. जोस बटलरने एका बाजूला पाय रोवत फलंदाजी केली. बटलरने आरसीबीच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. बटलरने राजस्थान रॉयल्सला फायनलमध्ये पोहचवलं.
5/10

वानंदु हसरंगा आणि जोश हेजलवूडचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. सर्वच गोलंदाज अपयशी ठरले... सिरज सर्वात महागडा गोलंदाज ठरला.. त्याशिवाय आरसीबीच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातही बऱ्याच चुका केल्या. बटलरला आरसीबीने जिवनदान दिले.. त्याचा फटका त्यांना बसला..
6/10

आरसीबीची केजीएफ म्हणजे कोहली, ग्लेन आणि फाफ ही तिकडी पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली.. विराट कोहली 8 चेंडूत सात धावा, फाफ डु प्लेसिस 27 चेंडूत 25 धावा तर ग्लेन मॅक्सवेल 13 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला..
7/10

महिपाल लोमरोरला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. तो 8 धावा काढून बाद झाला... फिनिशर कार्तिकलाही मोठी खेळी करता आली नाही... कार्तिक फक्त सहा धावा काढून बाद झाला.. त्यानंतर हसरंगा एकही धाव न काढता बाद झाला...
8/10

रजत पाटीदार याने एका बाजूने आरसीबीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पाटीदारने 42 चेंडूत 58 धावांची खेळी केली. आरसीबीचा संघ 157 धावांपर्यंत मजल मारु शकला. आरसीबीला अखेरच्या पाच षटकात फक्त 34 धावा काढता आल्या..
9/10

युजवेंद्र चहलला आरसीबीविरोधात एकही विकेट मिळाली नाही. सलग दोन सामन्यात चहलची विकेटची पाटी कोरी राहिली आहे. क्वालिफायर सामन्यातही गुजरातनेही चहलला विकेट दिली नव्हती. क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात आरसीबीच्या फंलदाजांनी चहलच्या गोलंदाजीवर सावध खेळी केली. चहललने चार षटकात तब्बल 45 धावा मोजल्या... विकेट मिळवण्यात चहल अपयशी ठरला. आरसीबीने चहलच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि एक चौकार वसूल केला.
10/10

जोस बटलरची शतकी (106) खेळी आणि प्रसिद्ध कृष्णा-अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गड्यांनी विजय मिळवलाय. या पराभवासह आरसीबीचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. राजस्थान रॉयल्सने 2008 नंतर आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. आता 29 मे रोजी राजस्थानचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सविरोधात होणार आहे.
Published at : 27 May 2022 11:29 PM (IST)
Tags :
IPL 2022अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion