एक्स्प्लोर
LSG vs CSK IPL 2025: धोनीला पाहून खडूस गोयंकांना कळून चुकलं आता काहीच चालणार नाही, पराभव झाल्यानंतर ऋषभ पंतकडे गेले अन्...
LSG vs CSK IPL 2025 : एमएस धोनीने आक्रमक फटकेबाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला.
LSG vs CSK IPL 2025
1/9

LSG vs CSK IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात काल (14 एप्रिल) झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायट्सच्या सामन्यात चेन्नईने 5 विकेट्सने सामना जिंकला.
2/9

न्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 11 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी केली आणि 3 चेंडू शिल्लक असताना आपल्या संघाला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला. आयपीएल 2025 च्या हंगामात चेन्नईचा हा दुसरा विजय आहे.
3/9

चेन्नईकडून रवींद्र जडेजाने २ बळी घेतले. नूर अहमदला बळी घेता आला नाही, मात्र त्याने 4 षटकांत केवळ 13 धावा देत लखनौला आक्रमकतेपासून रोखले.
4/9

लखनौचा कर्णधार ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौने समाधानकारक मजल मारली. पंतने मिचेल मार्शसह 33 चेंडूंत 50 धावांची भागीदारी केली. आयुष बदोनी, अब्दुल समद यांना मोठी खेळी करता आली नाही, मात्र त्यांनी पंतला चांगली साथ दिली. मात्र त्यांना धावा वाचवता आल्या नाही आणि चेन्नईकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.
5/9

लखनौचा सामना असला संघाचे मालक संजीव गोयंका यांच्यावर कायम लक्ष असते. सामन्यात पराभव झाल्यानंतर संजीव गोयंका ऋषभ पंतवर नाराज झाल्याचे याचं हंगामात पाहायला मिळाले. मात्र चेन्नईने पराभूत केल्यानंतर मैदानात चित्र काही वेगळे होते.
6/9

एमएस धोनीने आक्रमक फटकेबाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनीतला जुना फिनिशर जागा झाल्याचं लखनौविरुद्धच्या सामन्यात दिसून आले आणि हेच संजीव गोयंका यांना देखील कळून चुकले.
7/9

सामना गमावल्यानंतर देखील संजीव गोयंका खूप आनंदी दिसले. त्यांनी पहिले ऋषभ पंतला भेटत मिठी मारली आणि स्मितहास्य करत काहीतरी बोलताना देखील दिसले.
8/9

संजीव गोयंका आणि ऋषभ पंत सामना संपल्यानंतर एमएस धोनीसोबत संवाद साधताना देखील दिसले. सध्या या दरम्यानचे फोटो व्हायरल होत आहे.
9/9

एमएस धोनीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. एमएस धोनीने तब्बल 6 वर्षांनंतर सामनावीरचा पुरस्कार जिंकला.
Published at : 15 Apr 2025 09:26 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
राजकारण
क्रिकेट























