एक्स्प्लोर
GT vs SRH : पॅट कमिन्सचा एक निर्णय चूकला, गुजरातनं सनरायजर्स हैदराबादचा करेक्ट कार्यक्रम केला, गुणतालिकेत मोठी झेप
IPL 2025 : गुजरात टायटन्सनं सनरायजर्स हैदराबादला 38 धावांनी बाद पराभूत केलं आहे. या विजयासह गुजरात गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
GT vs SRH
1/6

सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या जोडीनं पॅट कमिन्सचा निर्णय चुकीचा ठरवला.
2/6

शुभमन गिलनं दमदार फलंदाजी करत 76 धावा केल्या. यात त्यानं 10 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानं साई सुदर्शन आणि जोस बटलर सोबत भागिदारी केली.
3/6

शुभमन गिलसोबत जोस बटलरनं देखील गुजरातसाठी दमदार फलंदाजी केली. त्यानं 64 धावा केल्या. शुभमन गिल, साई सदुर्शन आणि जोस बटलर या तिघांच्या फंलदाजीच्या जोरावर गुजरातनं 6 विकेटवर 224 धावा केल्या.
4/6

गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर गोलंदाजांनी देखील सनरायजर्स हैदरबादच्या फलंदाजांना जम बसवू दिला नाही. हैदराबादचा संघ 20 ओव्हरमध्ये 6 बाद 186 धावा करु शकला.
5/6

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात दमदार कामगिरी करत गुजरातनं गुणतालिकेत आता दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
6/6

सनरायजर्स हैदराबादच्या संघाचा आणखी एक पराभव झाला. सनरायजर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मानं 74, हेनरिक क्लासेन यानं 24 आणि नितीश कुमार रेड्डीनं 21 धावा केल्या. हैदराबादचे इतर फलंदाज दमदार कामगिरी करु शकले नाहीत. हैदराबाद सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
Published at : 02 May 2025 11:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















