एक्स्प्लोर
IPL 2022: मुंबईच्या सलग आठ पराभवांची 5 मोठी कारणं

(Photo Credit: PTI)
1/5

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईच्या संघानं ईशान किशनला 15.25 कोटीत विकत घेतलं. परंतु, यंदाचं हंगाम ईशान किशनसाठी खूप खराब ठरलं आहे. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 48 चेंडूत 81 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 54 धावा करणारा किशनला अखेरच्या सहा सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. चेन्नईविरुद्ध सामन्यात तो शून्यावर बाद झाला.
2/5

मुंबई इंडियन्सचा पाया असलेला जसप्रीत बुमराह यंदाच्या हंगामात फ्लॉप ठरला. त्यानं आतापर्यंत 8 सामन्यात केवळ 5 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहनं या हंगामात 30.2 षटक टाकली आणि सुमारे 8 च्या सरासरीने 229 धावा दिल्या. अनेक सामन्यांमध्ये फलंदाजांनी मुंबईच्या या वेगवान गोलंदाजाला लक्ष्य केले आहे.
3/5

मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्माची कामगिरी. पहिल्या सामन्यात रोहित शर्मानं चांगली फलंदाजी केली. पण त्यानंतर रोहित शर्माला काही खास कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात रोहितनं दिल्लीविरुद्ध 32 चेंडूत 41 धावा केल्या होत्या. लखनौविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यानं 31 चेंडूत 39 धावा केल्या. परंतु, मोठी धावसंख्या उभारण्यास तो अपयशी ठरला. रोहितनं आतापर्यंत 8 सामन्यात केवळ 153 धावा केल्या आहेत. ज्यात त्याला एकही अर्धशतक करता आलं नाही. सीएसकेविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही.
4/5

आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईच्या संघानं ट्रेन्ट बोल्टला रिलीज केलं होतं. त्यानंतर ऑक्शनमध्ये मुंबईच्या संघानं कोणत्याही मोठ्या गोलंदाजावर बोली लावली नाही. ज्यामुळं मुंबईला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजांचा तुडवडा जाणवत आहे. जयदेव उनादकटला आतापर्यंत फक्त सहा विकेट घेता आले
5/5

यंदाच्या हंगामात खराब प्रदर्शन करणाऱ्या मुंबईच्या संघाला फळीतील फलंदाजांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्याशिवाय एमआयच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्याच वेळी, संघासाठी फिनिशरची भूमिका बजावणारा कायरन पोलार्डदेखील या हंगामात तितका आक्रमक दिसला नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो. त्यानं आतापर्यंत 8 सामन्यात 115 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 25 धावा इतकी आहे.
Published at : 28 Apr 2022 07:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
