IPL 2023, KKR vs RCB : कोलकात्याचा संघ अडचणीत सापडला तेव्हा लॉर्ड शार्दुल ठाकूर संकटमोचक म्हणून धावून आला.
2/7
शार्दुल ठाकूर याने 68 धावांची विस्फोटक खेळी केली. शार्दुल ठाकूर याने रिंकू सिंह याला जोडीला घेत कोलकात्याची धावसंख्या 204 पर्यंत पोहचली.
3/7
आंद्रे रसेल बाद झाल्यानंतर कोलकात्याच्या चाहत्यांची निराशा झाली होती. पण लॉर्ड शार्दुल ठाकूर याने आंद्रे रसेलच्या स्टाईलने फटकेबाजी केली.
4/7
आंद्रे रसेल बाद झाल्यानंतर लॉर्ड शार्दुल ठाकूर मैदानात आला. कोलकात्याचा संघ अडचणीत होता. रसेलने निराश केल्यानंतर शार्दुल ठाकूर याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शार्दुल ठाकूर याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले.
5/7
शार्दुलने मैदानाच्या चोहूबाजूने चौकार आणि षटकार लगावले. शार्दुल ठाकरू याने 29 चेंडूत 68 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान शार्दुल ठाकूर याने तीन षटकार आणि 9 चौकार लगावले.
6/7
कोलकात्याचा अर्धा संघ 90 धावांच्या आत तंबूत परतल्यानंतर रिंकू सिंह आणि शार्दुल ठाकूर यांनी दमदार फलंदाजी केली. शार्दुल ठाकूर याने धावांचा पाऊस पाडला तर रिंकूने शार्दुल याला चांगली साथ दिली.
7/7
दोघांनी धावांचा पाऊस पाडत शतकी भागिदारी केली. केकेआर 150 धावांपर्यंत जाईल की नाही, यात साशंकता होती. पण शार्दुल आणि रिंकू यांच्या भागिदारीच्या जोरावर कोलकाताने 200 धावांचा पल्ला पार केला. रिंकू सिंह आणि शार्दुल ठाकूर यांनी 47 चेंडूत 103 धावांची भागिदारी केली. शार्दूल आणि रिंकू यांच्या भागिदारीमुळे कोलकात्याने दमदार पुनरागमन केले.