एक्स्प्लोर
In Pics : विजय बारसेंचा शिष्य थेट कतारला, स्लम सॉकरमधील स्टार फुटबॉलर शुभम पाटीलला फिफाचं आमंत्रण, पाहा फोटो
Fifa WC 2022 : कतारमध्ये यंदा फिफा विश्वचषक आजपासून सुरु होत आहे, या स्पर्धेसाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी कमालीचे उत्सुक दिसत आहेत.
FIFA World Cup 2022
1/10

फिफा फुटबॉल विश्वचषक आजपासून सुरु होत आहे. कतारमध्ये यंदा ही स्पर्धा पार पडत आहे.
2/10

या भव्य क्रीडा आयोजनात फिफाने नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची आठवण आवर्जून ठेवली आहे.
3/10

स्लम सॉकरच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलपटू बनवण्याचा काम गेले अनेक दशकं विजय यांनी केलं असून आता फिफा ने बारसेंच्या एका शिष्याला विश्वचषक पाहण्यासाठी थेट कतारला आमंत्रित केलं आहे.
4/10

स्लम सॉकरच्या माध्यमातून फुटबॉलपटू बनलेला शुभम पाटील हा तरुण विजय बारसे यांच्या स्लम सॉकर चा प्रतिनिधित्व करत फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला गेला आहे. '
5/10

फिफा एक जगातील श्रीमंत संघटना असली, तरी फुटबॉल मुळात गरीबांचा खेळ आहे, असं बारसे यांनी म्हटलं आहे.
6/10

तसंच फिफाने स्लम सॉकर खेळणाऱ्या गरीब मुलांची आठवण ठेवली आहे. हेच महत्त्वाचे आहे,'' असं मत विजय बारसे यांनी व्यक्त केलं आहे.
7/10

शुभम पाटील अत्यंत गरीब घरातून आला असून फुटबॉलच्या माध्यमातून त्याने आपले जीवन नव्याने उभारले आहे.
8/10

आता तो विश्वचषक पाहण्यासाठी कतारला जाणार असून ही त्याच्यासह सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
9/10

फिफा विश्वचषकाचे ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील.
10/10

3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल
Published at : 20 Nov 2022 06:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























