एक्स्प्लोर
Photos: रोहित शर्मानंतर टीम इंडियाचं कसोटी क्रिकेट कर्णधारपद कोणाकडे? 'हे' 4 खेळाडू शर्यतीत
WTC मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आणि तेव्हापासूनच खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न ऐरणीवर आला. अशातच टीम इंडियातील अनेक दिग्गज गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतग्रस्त असल्यामुळे मैदानापासून दूर आहेत.

Team India Test Captain
1/7

Team India Test Captain: WTC मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आणि तेव्हापासूनच टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न ऐरणीवर आला. अशातच टीम इंडियातील अनेक दिग्गज गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतग्रस्त असल्यामुळे मैदानापासून दूर आहेत. तसेच, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही फिटनेसमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून रोहित आपला फॉर्मही गमावून बसल्याचं अनेक क्रिडा विश्लेषकांचं मत आहे.
2/7

गेल्या काही दिवसांपासून रोहितच्या फिटनेसवरुन अनेक प्रश्न उपस्थित करत, नेटकरी सतत रोहित शर्माला फैलावर घेत आहेत. त्याच्यावर अनेक मिम्सही शेअर केले जात आहेत. एवढंच नाहीतर आता टीम इंडियाला कर्णधार बदलण्याची गरज आहे, असंही बोललं जात आहे. पण जर खरंच टीम इंडियामध्ये बदल करुन कर्णधार बदलायचा असेल तर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असेल? असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होतोय. अशीच काही नावं सध्या चर्चेत आहेत. पाहुयात कोणती नावं चर्चेत आहेत.
3/7

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवानंतर भारतीय संघाला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित करण्यात आलं होतं. रोहित जवळपास 36 वर्षांचा आहे. तो आणखी काही वर्ष खेळणार आहे. मात्र सध्या टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदासाठी तरी पर्याय दिसत नाही. मात्र, काही खेळाडू भविष्यात कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची धुरा आपल्या खांद्यांवर पेलण्यासाठी अनेक खेळाडूंची नावं चर्चेत आहेत.
4/7

टीम इंडियाचा युवा खेळाडू ऋषभ पंतनं अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं 33 कसोटी सामन्यांमध्ये 2271 धावा केल्या आहेत. पंतनं या कालावधीत 5 शतकं आणि 11 अर्धशतकं झळकावली आहेत. त्यानं आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं. भारताच्या पुढील कसोटी कर्णधार म्हणून पंतकडे पर्याय म्हणून पाहिलं जाऊ शकतं. काही दिवसांपूर्वी पंतचा अपघात झाला होता, सध्या तो उपचार घेत असून अजुनही तो मैदानात परतलेला नाही.
5/7

युवा फलंदाज शुभमन गिलनं आपल्या कामगिरीनं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यानं टीम इंडियासाठी 16 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान दोन शतकं आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत. शुभमनकडे कर्णधारपदाचा पर्याय म्हणूनही पाहिलं जाऊ शकतं. पण सध्या त्याला अधिक अनुभवाची गरज आहे. त्यामुळे गिलकडे कर्णधार पद सोपवलं जाणार की, नाही? हे येणारा काळच सांगेल.
6/7

भारतीय संघाचा प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे सध्या मैदानापासून लांब आहे. त्यानं आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले असून या कालावधीत त्यानं 666 धावा केल्या आहेत. अय्यरनं आतापर्यंत 5 अर्धशतकं झळकावली आहेत. तो टीम इंडियासाठी कसोटी कर्णधार म्हणून चांगला पर्याय ठरू शकतो.
7/7

भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह कर्णधारपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्यानं 30 कसोटी सामने खेळताना 128 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह 29 वर्षांचा आहे. लवकरच तो टीम इंडियात सहभागी होऊन खेळताना दिसेल.
Published at : 20 Jun 2023 01:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
