एक्स्प्लोर
Ind vs Aus Tanush Kotian: रविचंद्रन अश्विनची जागा मुंबईकराने घेतली; टीम इंडियात स्थान पटकावलं, कोण आहे तनुष कोटियन?
Ind vs Aus Tanush Kotian: तनुष कोटियनला रविचंद्रन अश्विनच्या जागी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
Ind vs Aus Tanush Kotian
1/9

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मधील शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियनला रविचंद्रन अश्विनच्या जागी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
2/9

तनुष कोटियनचा जन्म मुंबईत झाला आणि तो मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. तो रविचंद्रन अश्विनसारखा अष्टपैलू गोलंदाज आहे.
3/9

उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करताना, तनुष कोटियनने आतापर्यंत त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 101 विकेस्ट घेतल्या आहेत आणि 2 शतकांसह 1,525 धावा देखील केल्या आहेत.
4/9

2023-2024 च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव करून 42व्यांदा रणजी करंडक जिंकला.
5/9

अंतिम सामन्यात कोटियनने एकूण 7 विकेट्स घेत मुंबईला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. संपूर्ण स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 10 सामन्यांत त्याने 29 बळी घेतले.
6/9

तनुष कोटियनने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकदा शतक झळकावले, असे म्हटले तर तुमचा विश्वास बसेल का? हे रणजी ट्रॉफी 2023-24 च्या उपांत्यपूर्व सामन्याबद्दल आहे जेव्हा मुंबईचा सामना बडोदाविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात दहाव्या क्रमांकावर असलेल्या तनुष कोटियन आणि 11व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तुषार देशपांडेनेही शतके झळकावली. या दोघांमध्ये अखेरच्या विकेटसाठी 232 धावांची भागीदारी झाली. त्या सामन्यात 120 धावा करून कोटियन नाबाद परतला.
7/9

कोटियनला अद्याप वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळालेले नाही, परंतु वर्ष 2017 मध्ये त्याने अंडर-19 स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. दुर्दैवाने, 2018 च्या अंडर-19 विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. तो शुभमन गिल, अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांच्यासोबत अंडर-19 स्तरावर खेळला आहे.
8/9

तनुष कोटियनला कदाचित आयपीएल 2025 मेगा लिलावात खरेदीदार मिळाला नाही, परंतु कोटियन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. आयपीएल 2024 मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. संपूर्ण मोसमात त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये कोटियनने 24 धावा केल्या.
9/9

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मधील शेवटच्या 2 कसोटींसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, हर्षित राणा, नितीश, सुंदर, पडिक्कल, तनुष कोटियन
Published at : 24 Dec 2024 07:53 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























