एक्स्प्लोर
In Pics : धोनी आणि पांड्या बनले शोले चे 'जय-वीरू', पाहा खास फोटो
Hardik Pandya : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने एमएस धोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शनही हटके दिलं आहे.
![Hardik Pandya : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने एमएस धोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शनही हटके दिलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/54ec498078d2d7d8352152a0195162151674733890249323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandya and Dhoni
1/10
![भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्या यांच्यात अगदी खास नातं असून पांड्या कायम धोनीला आपला आयडॉल मानताना दिसून आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/18e2999891374a475d0687ca9f989d8359027.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्या यांच्यात अगदी खास नातं असून पांड्या कायम धोनीला आपला आयडॉल मानताना दिसून आला आहे.
2/10
![तो अनेकदा सोशल मीडियावर धोनीसोबतचेच फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करत असल्याचं दिसून आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566091548.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तो अनेकदा सोशल मीडियावर धोनीसोबतचेच फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करत असल्याचं दिसून आलं आहे.
3/10
![आताही हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. काही वेळातच या फोटोवर हजारो लाईक्स पडले असून अनेकजण रिशेअर देखील करताना दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd900956.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आताही हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. काही वेळातच या फोटोवर हजारो लाईक्स पडले असून अनेकजण रिशेअर देखील करताना दिसत आहेत.
4/10
![आतातर या फोटोला लाईक करणाऱ्या युजर्सची संख्याही लाखोंच्या घरात पोहोचली आहे. तर हा फोटो व्हायरल होण्यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिलं म्हणजे, या फोटोमध्ये हार्दिक हा कॅप्टन कूल एमएस धोनीसोबत दिसत आहे.धोनीचे मैदानाबाहेरचे फोटो सोशल मीडियावर क्वचितच पाहायला मिळतात तसंच हा फोटो प्रसिद्ध हिंदी सिनेमा शोलेच्या 'जय आणि वीरू' यांच्याप्रमाणे दोघांनी काढला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/ae566253288191ce5d879e51dae1d8c30cce7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आतातर या फोटोला लाईक करणाऱ्या युजर्सची संख्याही लाखोंच्या घरात पोहोचली आहे. तर हा फोटो व्हायरल होण्यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिलं म्हणजे, या फोटोमध्ये हार्दिक हा कॅप्टन कूल एमएस धोनीसोबत दिसत आहे.धोनीचे मैदानाबाहेरचे फोटो सोशल मीडियावर क्वचितच पाहायला मिळतात तसंच हा फोटो प्रसिद्ध हिंदी सिनेमा शोलेच्या 'जय आणि वीरू' यांच्याप्रमाणे दोघांनी काढला आहे.
5/10
![या फोटोमध्ये हार्दिक आणि धोनी एकाच बाईकवर बसले आहेत. जी शोले सिनेमामध्ये दिसली होती. जय म्हणजेच अमिताभ बच्चन आणि वीरू म्हणजेच धर्मेंद्र या अभिनेत्यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक असलेल्या 'शोले'मधी लूकमध्ये दोघे दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800f7f53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये हार्दिक आणि धोनी एकाच बाईकवर बसले आहेत. जी शोले सिनेमामध्ये दिसली होती. जय म्हणजेच अमिताभ बच्चन आणि वीरू म्हणजेच धर्मेंद्र या अभिनेत्यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक असलेल्या 'शोले'मधी लूकमध्ये दोघे दिसत आहेत.
6/10
![या फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने शोलेचा उल्लेखही केला आहे. त्याने लिहिले आहे, 'शोले-2 लवकरच येत आहे' ज्यामुळे हा फोटो अनेकजण लाईक आणि पुन्हा शेअर करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef9b012.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने शोलेचा उल्लेखही केला आहे. त्याने लिहिले आहे, 'शोले-2 लवकरच येत आहे' ज्यामुळे हा फोटो अनेकजण लाईक आणि पुन्हा शेअर करत आहेत.
7/10
![काही दिवसांपूर्वीच पांड्यासोबतचा धोनीचा नाचतानाचा एक डान्स व्हिडीओही व्हायरल झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/8cda81fc7ad906927144235dda5fdf15fd4f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वीच पांड्यासोबतचा धोनीचा नाचतानाचा एक डान्स व्हिडीओही व्हायरल झाला होता.
8/10
![हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून भारतीय टी-20 संघाची धुरा सांभाळत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच भारतीय संघाचा T20 कर्णधार बनलेल्या हार्दिकने अलीकडेच नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेचा आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या T20 मालिकेचा कर्णधारपद भूषवलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/156005c5baf40ff51a327f1c34f2975b2e33e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून भारतीय टी-20 संघाची धुरा सांभाळत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच भारतीय संघाचा T20 कर्णधार बनलेल्या हार्दिकने अलीकडेच नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेचा आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या T20 मालिकेचा कर्णधारपद भूषवलं आहे.
9/10
![या तिन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. आता तो पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/032b2cc936860b03048302d991c3498f79c73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या तिन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. आता तो पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
10/10
![भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही मालिका उद्या अर्थात 27 जानेवारीपासून सुरू होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/30e62fddc14c05988b44e7c02788e1873d8b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही मालिका उद्या अर्थात 27 जानेवारीपासून सुरू होत आहे.
Published at : 26 Jan 2023 05:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)