अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सोशल मीडियावर सक्रीय आहे. रहाणे खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे सध्या भारतीय संघाबाहेर आहे. आयपीएल 2022 मध्येही रहाणेला मोठी खेळी करता आली नाही. अजिंक्य रहाणे मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.. रहाणेच्या क्रिकेट करिअरची सुरुवात डोंबिवलीतून झाली.
2/7
अजिंक्य रहाणेनं भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून दिलाय... मोक्याच्या क्षणी अजिंक्य रहाणेनं अनेकदा शतकी खेळी केली. पाहूयात अजिंक्य रहाणेची संपत्ती आणि वार्षिक उत्पनानाबाबत..
3/7
रिपोर्ट्सनुसार, अजिंक्य रहाणेची एकूण संपत्ती 9 मिलिअन अमरिकन डॉलर इतकी असल्याचा अंदाज आहे. म्हणजेच, जवळपास 65 कोटी रुपये. अजिंक्य रहाणेचा कमाईचा मुख्य सोर्स क्रिकेट आहे. त्याशिवाय जाहिरातीतूनही अजिंक्य चांगली कमाई करतो.
4/7
अजिंक्य रहाणेची ब्रँड व्हॅल्यू मोठी आहे. जगभरातील अव्वल क्रिकेटपटूमध्ये रहाणेचेही नाव घेतले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच आयपीएलमधूनही अजिंक्य रहाणे पैसे कमावतो. यंदाच्या मेगा लिलावात अजिंक्य रहाणेला कोलकाताने एक कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.
5/7
रिपोर्ट्सनुसार अजिंक्य रहाणे महिन्याला जवळपास 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतो. त्याची वार्षिक कमाई सहा कोटींपेक्षा जास्त आहे. बीसीसीआयने अजिंक्य रहाणेसोबत ग्रेड बी चा करार केलाय. अशात बीसीसीआयकडून वार्षिक तीन कोटी रुपये मिळलात.. तर जाहिरातीतून वर्षाला जवळपास एक कोटी रुपयांची कमाई करतो.
6/7
अजिंक्य रहाणेने आतापर्यंत 82 कसोटीतील 140 डावात 4931 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतकं आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 90 एकदिवसीय सामन्यात अजिंक्य रहाणेनं 2962 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 20 टी सामन्यात 375 धावा केल्यात.
7/7
स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे 2011 मध्ये अजिंक्य रहाणेला इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळाले होते. पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणेनं 40 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये 2013 मध्ये अजिंक्य रहाणेनं कसोटीत पदार्पण केले होते. या सामन्यात रहाणेला दोन्ही डावात फक्त आठ धावाच करता आल्या होत्या. (सर्व फोटो - अजिंक्य रहाणे सोशल मीडिया)