एक्स्प्लोर
Pawar Land Row: 'आधी २१ कोटी भरा, मगच व्यवहार रद्द', Parth Pawar यांना निबंधक कार्यालयाचा झटका
पुण्यातील मुंढवा (Mundhwa) येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला एकवीस कोटींचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरावं लागेल', अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे. अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर अमेडिया कंपनीने (Amedia Company) नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र, आयटी पार्कच्या नावाखाली पूर्वी मिळवलेली मुद्रांक शुल्कातील सवलत आता लागू होणार नाही, असे सांगत निबंधक कार्यालयाने ही अट घातली. ३०० कोटी रुपयांच्या या व्यवहारावर ७ टक्के दराने (५% मुद्रांक शुल्क, १% स्थानिक संस्था कर आणि १% मेट्रो कर) एकूण २१ कोटी रुपये भरावे लागतील, त्यानंतरच व्यवहार रद्द होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता पवार कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















