एक्स्प्लोर

Beed crime news: बीडमध्ये सोन्यापेक्षा महागड्या पदार्थाची तस्करी, व्हेल माशाची 1.5 कोटींची उलटी जप्त

Beed news: सोन्याहून महाग असलेल्या व्हेल माशाची दीड कोटी रुपयांची उलटी बीडमध्ये जप्त. अंबरग्रीस नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पदार्थाला बाजारपेठेत प्रचंड मागणी असते.

Whale vomit in Beed: बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथे कारमधून व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दीड कोटी रुपयांच्या जवळपास किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (whale vomit) विक्री करणारे दोघे बीड शहरात येत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शहरानजीकच्या एका हॉटेलजवळ, चऱ्हाटा फाटा येथे सापळा रचण्यात आला. या दरम्यान दोघांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. (Beed News)

या कारवाईत शैलेंद्र प्रभाकर शिंदे आणि विकास भीमराव मुळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या दोघांकडून दीड किलोच्या जवळपास वजनाची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त केली आहे. बाजारभावानुसार ज्याची अंदाजित किंमत दीड कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या उलटीची वनविभागाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, पुढील तपासणीसाठी ती आता प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे. पकडलेल्या दोघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक बांगर यांनी सांगितले.

Beed Suicide Case: बीड नगर परिषदेच्या इमारतीच्या छतावर कर्मचाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह

बीड नगर परिषदेच्या इमारतीच्या छतावर एका कर्मचाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. अविनाश धांडे असे कर्मचाऱ्याचे नाव असून ते बीड नगरपरिषद वसुली विभागात कार्यरत होते. सकाळच्या सुमारास धांडे यांचा मृतदेह नगर परिषदेच्या इमारतीवरील एका शिडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याचा पंचनामा केला जातोय. दरम्यान या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Bhandara Crime News: भंडाऱ्याच्या खापा गावात दोन गटात तुफान राडा

भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील खापा गावात सुरू असलेल्या मंडईच्या लावणी कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर रामटेक - गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावरील खापा चौकात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या मारहाणीत चार जण किरकोळ जखमी झालेत. याची माहिती मिळतात तुमसर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठत मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतलं तर काहींना तिथून हुसकावून लावलं. दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीमुळे खापा चौकात रात्रीला काही काळ तणावाचं वातावरण होतं. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतलं असून अधिक तपास आता सुरू आहे.

आणखी वाचा

मुंबईत एका पॉश सोसायटीत 27 वर्षीय मोलकरणीने उचललं टोकाचं पाऊल; पोलीस तपासात धक्कादायक कारण उघड

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget