Maharashtra Live blog: 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली? पुणे पोलिसांकडून शोधाशोध सुरु
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog: ६९ वर्षीय निवृत्त टाटा हॉस्पिटल कर्मचारी आणि बीडीडी चाळ येथील रहिवासी असलेले वृद्ध “डिजिटल अरेस्ट” घोटाळ्याचे बळी ठरले असून त्यांनी सायबर गुन्हेगारांवर विश्वास ठेवून तब्बल ७५.५ लाख रुपये गमावले आहेत. दिल्ली पोलिस अधिकारी असल्याचे सांगत त्यांची या सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. सेंट्रल रिजन सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, २२ ऑगस्ट रोजी पीडित व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने स्वतःला दिल्ली पोलिसांचा अधिकारी म्हणून ओळख करून दिली आणि सांगितले की त्यांच्या बँक ऑफ बडोदा खात्याचा वापर २.८३ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात झाला आहे. या प्रकरणात त्यांना अटक होणार असल्याचे सांगून “डिजिटल अरेस्ट” अंतर्गत ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यानंतर त्यांना एका पोलिस वर्दीतील व्यक्तीकडून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव पोलीस निरीक्षक गोपेश कुमार असे सांगून बनावट कागदपत्रे दाखवली आणि “जामीन रकम” भरण्याची मागणी केली. घाबरलेल्या पीडित व्यक्तीने १८ लाख रुपयांचे म्युच्युअल फंड विकले आणि नंतर आपले बोरीवली येथील घर विकून एकूण ७५.५ लाख रुपये त्या फसवणूक्यांना हस्तांतरित केले. रक्कम परत न मिळाल्याने आणि कॉल्सना प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी अखेर २७ ऑक्टोबर रोजी ही फसवणूक पोलिसांकडे नोंदवली.
धनंजय मुंडे यांचं आव्हान मनोज जरांगे यांनी स्वीकारलं
धनंजय मुंडे यांचं आव्हान मनोज जरांगे यांनी स्वीकारलं,
मनोज जरांगे यांची नार्कोटेस्ट करावी या मागणीसाठी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी जरांगेंचं शिष्टमंडळ दाखल...
अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह मनोज जरांगे यांचे सहकारी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी दाखल झाले आहेत...
काल धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माझी आणि मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. यानंतर मनोज जारंगे यांनी धनंजय मुंडे यांच आव्हान स्वीकारत आपण नार्को टेस्ट साठी तयार असल्याच म्हटलं होतं. आज याच मागणीसाठी मनोज जरांगे यांचे सहकारी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
मनोज जरांगे यांनी आपण नार्को टेस्ट साठी तयार असल्याचे सांगत, आजच सर्वांची नार्को टेस्ट करावी , अशा स्वरूपाची मागणी या निवेदनात केल्याचं त्यांचे सहकारी पांडुरंग तारक यांनी म्हंटलय..
बाईट -- पांडुरंग तारख, मनोज जरांगे यांचे सहकारी..
अमरावती जिल्हा काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु; शेकडो इच्छुकांची उपस्थिती
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्यानंतर राजकीय पक्षांतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती जिल्हा काँग्रेसतर्फे आज आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या या मुलाखतींमध्ये जिल्ह्यातील शेकडो इच्छुकांनी उपस्थिती लावली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगरपरिषदा आणि नगरपालिकांमध्ये निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची नावे निश्चित करून महाराष्ट्र प्रदेश समितीकडे पाठवण्यात येतील अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी यावेळी दिली.























