100व्या कसोटी सामन्यासाठी आणि कारकिर्दीतील एका महत्त्वाच्या टप्प्यासाठी लायननं खास शूज घातले होते. या शूजवर त्याच्या नावाची आद्याक्षरं आणि 100 हा आकडा स्पष्टपणे दिसून येत होता. (छाया सौजन्य- ट्विटर)
2/6
(छाया सौजन्य- इ्स्टाग्राम)
3/6
ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी 100 वी कसोटी खेळणारा नॅथन लायन हा तिसरा गोलंदाज ठरला आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
4/6
आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याची सर्वाधिक कामगिरी होती, 50 धावा देत 8 गडी बाद करण्याची. एक यशस्वी खेळाडू म्हणूनच तो सध्या क्रीडारसिकांची शाबासकी मिळवत आहे. (छाया सौजन्य- एएफपी)
5/6
ऑस्ट्रेलियातील सर्वात यशस्वी ऑफ स्पिनर अर्थात फिरकी गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्यानं यापूर्वी 99 कसोटी सामन्यांत 396 विकेट घेतल्या आहेत. 100 कसोटी सामन्यांचा आकडा गाठणारा तो 13 वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. (छाया सौजन्य- एएफपी)
6/6
ब्रिस्बेन कसोटी भारतीय क्रिकेट संघासाठी अतिशय महत्त्वाची असतानाच ऑस्ट्रेलियातील खेळाडू नॅथन लायन Nathan Lyon याच्यासाठीही हा समना खास ठरत आहे. याचं कारण म्हणजे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना आहे. (छाया सौजन्य- एएफपी)