Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Jalgaon Train Accident : पुष्पक एक्स्प्रेसला आग लागण्याच्या भीतीने अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. यात 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण गंभीर जखमी आहेत.
Jalgaon Train Accident : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी भीषण दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला (Pushpak Express Fire) आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या. मात्र त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने (Karnataka Express) अनेकांना उडवले. या भीषण अपघातात (Train Accident) आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जखमी झाले आहेत. जखमींवर जळगाव (Jalgaon News) आणि पाचोरा (Pachora) येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून आता 13 मृतांपैकी 7 मृतांची ओळख पटली आहे. यात नेपाळमधील (Nepal) चार जणांचा तर उत्तर प्रदेशातील तीन जणांचा समावेश आहे.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे :
1. कमला नवीन भंडारी (43, नेपाळ, हल्ली मुक्काम कुलाबा ),
2. लच्छीराम खमू पासी (40, नेपाळ)
3. इम्तियाज अली (35, उत्तरप्रदेश)
4. नसरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दीकी (19, उत्तरप्रदेश)
5. जवकला भटे जयकडी (80, नेपाळ)
6. हिनू नंदराम विश्वकर्मा (10, नेपाळ)
7. बाबू खान (27 वर्षे, उत्तरप्रदेश)
जखमींची नावे पुढीलप्रमाणे :
1. अबू मोहम्मद (30, तालबाघौडा, जि. श्रावस्ती, उत्तर प्रदेश)
2. हकीम अन्सारी (45, तिलवार रतनपूर, जि. श्रावस्थी, उत्तर प्रदेश)
3. हसन अली (19, गिलोला, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)
4. विजयकुमार गौतम (33, बेलपूर बगई, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)
5. उत्तम हरजन (25, बेलपूर बगई, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)
6. मोहम्मद निब्बर (31, डिकौली, जि. श्रावस्थी, उत्तर प्रदेश)
7. उजाला सावंत (38, अछाम, जि. मंगलसेन, नेपाळ)
8. दिपक थापा (18, दुल्लू (नगरपालिका) जि. दहिलोक, नेपाळ)
9. धर्म बहादूर सावंत (8, अछाम, जिल्हा. मंगलसेन, नेपाळ)
10. मंजू परिहार (25, दुल्लू (नगरपालिका) जि. दहिलोक, नेपाळ)
मृतांचे शव मूळ गावी पाठवणार
दरम्यान, जळगाव जिल्हा रुग्णालयात (Jalgaon Hospital) सध्या मृतकांचे नातेवाईक जमायला सुरुवात झाली आहे. मृतांमध्ये चार जण नेपाळचे असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे नातेवाईक पुणे आणि मुंबई येथून जळगाव येथे पोहचले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांचे शव आज त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार आहे तर काही मृतांवर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार?