एक्स्प्लोर

World Cancer Day 2024 : स्त्रियांमध्ये आढळणारे कॅन्सरचे प्रकार कोणते? जाणून घेऊया..

World Cancer Day 2024 : जागतिक कर्करोग दिन!

जागतिक कर्करोग दिन! (Photo Credit : unsplash) (Photo Credit : pixabay)

1/12
दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. यावर्षीची कर्करोग दिनाची थीम
दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. यावर्षीची कर्करोग दिनाची थीम "कॅन्सर केअर गॅप कमी करा" अशी आहे. (Photo Credit : unsplash)
2/12
जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे कॅन्सरबद्दल जागरूकता वाढविणे. युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) च्या नेतृत्वाखाली UN-मान्यताप्राप्त असा हा दिवस आहे. (Photo Credit : unsplash)

3/12
अनेकदा महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. वेळीच निदान व उपचार न झाल्यामुळे कॅन्सर बळावण्याची शक्यता अधिक असते. भारतात महिलांना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. (Photo Credit : unsplash)

4/12
महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये स्तनांचा कॅन्सर, सर्व्हायकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि  तोंडाचा कॅन्सर प्रामुख्याने दिसून येतात. या व्यतिरिक्त ब्लॅडर कॅन्सर, ब्लड कॅन्सर, कोलन आणि रेक्टल कॅन्सर, किडनी कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, लंग अर्थात फुफ्फुसाचा कॅन्सर, पॅनेक्रॅटिक कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, थॉयरायईड कॅन्सर, मेलेनोमा, ब्रेन कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सर, स्किन कॅन्सर हे अन्य काही प्रकार आहेत. (Photo Credit : unsplash)

5/12
स्तनाचा कर्करोग - स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास मृत्यूही होऊ शकतो. स्तनाचा कर्करोग म्हणजे एक किंवा दोन्ही स्तनांमध्ये घातक कर्करोगाच्या पेशींची वाढ. ते अत्यंत घातक आहे. स्तनातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो. स्तनाच्या कर्करोगाचे चार टप्पे असतात. जर त्याची लक्षणे पहिल्या टप्प्यात आढळली तर पूर्ण बरे होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढते. स्टेज 3 आणि 4 खूप धोकादायक आणि घातक असल्याचे सिद्ध होते.  (Photo Credit : unsplash)

6/12
गर्भाशय मुखाचा कर्करोग - ह्यूमन पेपिलोमा या विषाणूच्या संक्रमणाने हा कर्करोग होतो. कमी वयात तसेच जास्त पुरूषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांना हा कर्करोग होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे 40 ते 50 वयाच्या दरम्यान या कर्करोगाचे प्रमाण दिसून येते. लैंगिक संबधांदरम्यान तीव्र वेदना, स्त्रियांच्या गुप्तांगामधून दुर्गंध येणं, लैंगिक संबंधांनतर गुप्तांगांमधून रक्तस्राव, पीरियड्समध्ये अनियमितता, जास्त थकवा, वजन कमी होणं, पोटात दुखणं आणि लघवी होताना वेदना होणं, ही गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं आहेत. हा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाशी पेशी जास्त वाढल्यामुळे होतो.  (Photo Credit : pixabay)

7/12
वल्वर (योनीमार्गातील) कर्करोग - महिलांच्या गुप्तांगाच्या बाहेरील भागात वल्वर कर्करोग होतो. याला वल्वर कॅन्सर म्हणतात. हे प्रामुख्याने मूत्रमार्ग आणि योनीच्या पृष्ठभागावर स्थित आहे. त्याला वेस्टिब्यूल देखील म्हणतात. त्यामध्ये योनीवर खाज सुटलेल्या गाठी किंवा फोड असतात, जे कर्करोगाचे असू शकतात. जेव्हा पेशी त्याच्या डीएनएमध्ये उत्परिवर्तन करते तेव्हा कर्करोग सुरु होतो.  (Photo Credit : pixabay)

8/12
तोंडाचा कर्करोग - तोंडाचा कर्करोग म्हणजे तोंडातील ऊतींची असामान्य वाढ जी कर्करोगात बदलते. हे तोंडापासून नाक, मानेच्या भागात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकते. सुरुवातीला, तोंडात पांढरे किंवा लाल ठिपके पडणे, जीभ, ओठ किंवा तोंडावर फोड येणे, तोंडातून रक्त येणे, तोंडाच्या भागात सूज येणे आणि गिळण्यास त्रास होणे ही लक्षणे असू शकतात. तोंडाचा कर्करोग होण्यासाठी तंबाखूचे सेवन हा प्रमुख घटक आहे. गुटखा, जर्दा, मावा, खर्रा, खैनी, सिगारेट, बिडी आणि हुक्का यासारख्या विविध प्रकारातील तंबाखूचा वापर हे ट्यूमर होण्याचे प्रमुख कारण आहे. (Photo Credit : pixabay)

9/12
अंडाशयाचा कर्करोग - अंडाशयाचा कर्करोग हा बहुतांशवेळा चाळिशीनंतर वा रजोनिवृत्तीनंतर होतो. पोट फुगल्यासारखं वाटणं, धाप लागणं, वारंवार लघवीला जावं लागणं, ॲसिडिटीचा त्रास, मासिक पाळीत अनियमितता इत्यादी अस्पष्ट लक्षणे आढळतात. (Photo Credit : pixabay)

10/12
फुफ्फुसांचा कॅन्सर - या कॅन्सरचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. यात नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सरचा समावेश होतो. सामान्यतः धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना या कर्करोगाचा धोका अधिक असतो. परंतु, व्यसन नसलेल्या व्यक्तींनाही हा कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Photo Credit : pixabay)

11/12
युरिनरी कॅन्सर - वारंवार लघवीला होणे, लघवीला साफ न होणे किंवा मूत्राशयाच्या कार्यात बिघाड निर्माण होणे ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात. महिलांमध्ये युरिनरी इन्फेक्शनमुळे देखील हा त्रास वारंवार जाणवतो. (Photo Credit : unsplash)

12/12
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने

Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Anna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहनBajrang Sonwane On oppenent : विरोधकांकडून पैसै वाटले जातात, बजरंग सोनावणेंचा आरोपABP Majha Headlines : 10 AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  9  AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही

Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर

Embed widget