एक्स्प्लोर
Russia-Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धाचा प्रवास महायुद्धाकडे? पाहा फोटो!

Russia-Ukraine Crisis
1/12

रशियाने सुरू केलेल्या या युद्धात सामान्य नागरीक होरपळून निघत आहे.
2/12

युक्रेनमधील हजारो नागरीक बेघर झाले आहेत. जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे.
3/12

रशियाने केलेल्या हल्ल्यात पहिल्याच दिवशी युक्रेनमधील 137 जणांचा मृत्यू झाला.
4/12

युक्रेनवरील हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
5/12

युक्रेनमधील सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर युद्धाची झळ बसत आहे.
6/12

युक्रेनची राजधानी कीववरही रशियन फौजांनी हल्ले सुरू केले आहेत.
7/12

रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याला युक्रेनच्या सैन्याकडून जोरदार प्रतिकार करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी कीवमध्ये 6 स्फोट झाल्याचे वृत्त आहे. हे हल्ले क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांकडून करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
8/12

रशियन फौजांनी गुरुवारी चेर्नोबिल अणू प्रकल्पाचा ताबा मिळवला आहे. वर्ष 1986 मध्ये या अणू ऊर्जा प्रकल्पात मोठा स्फोट झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग पसरला होता.
9/12

त्यामुळे या परिसरातील जनजीवन उद्धवस्त झाले होते. सध्या या अणू ऊर्जा प्रकल्पाची जागा अणू प्रकल्पातील टाकाऊ वस्तूंचे केंद्र आहे.
10/12

त्याशिवाय या ठिकाणी अनेक टन अणू इंधनाचा साठादेखील आहे. चेर्नोबिल अणू प्रकल्प रशियन फौजांच्या ताब्यात गेल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11/12

युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी (Volodymyr Zelenskyy)यांनी याआधीच रशियन सैन्य चेर्नोबिल अणू प्रकल्पाचा ताबा घेऊ शकतात अशी शंका व्यक्त केली होती. आमचे सैनिक प्राणांची पर्वा न करता या भागाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतील असेही झेलेन्सकी यांनी युद्धापूर्वी म्हटले होते.
12/12

रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले सुरू असून सामान्य नागरिकांना प्राण गमवावे लागत आहे.
Published at : 25 Feb 2022 02:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
वर्धा
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
