मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका देशात गुरुवारी (7 एप्रिल) रोजी भयंकर अपघात घडला. इमर्जन्सी लॅण्डिंगच्या वेळी विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत.
2/6
कोस्टा रिकाच्या ज्युआन सँटा मारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला. DHL च्या मालवाहू विमानात काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यानंतर ज्युआन सँटा मारिया विमानतळावर विमानाने इमर्जन्सी लॅण्डिंग केली. यादरम्यान विमानाचे दोन तुकडे झाले.
3/6
विमान तुटलं यावरुनच अपघात किती मोठा असेल याचा अंदाज येता. दिलासादायक बाब म्हणजे हे प्रवासी विमान नव्हतं, मालवाहू विमान होतं. मालवाहू विमानातून सामान एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं.
4/6
डीएचएलच्या या मालवाहू विमानात केवळ दोन क्रू मेंबर होते. जे व्यवस्थित असल्याचं कळतं. वैमानिकाला कोणतीही दुखापत झालेली नाही.
5/6
जर्मनीची कंपनी डीएचएलचं पिवळ्या रंगाचं हे विमान जेव्हा जमिनीवर आलं तेव्हा त्यामधून धूर निघत होता. विमान रनवेवरुन घसरल आणि मग विमानाचं मागच्या चाकापासून दोन तुकड्यांमध्ये विभागलं.
6/6
हा अपघात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता झाला. बोईंग-757 विमानाने सँटा मारिया विमानतळावरुनच उड्डाण केलं होतं. पण 25 मिनिटांनी ते तिथेच परत आलं, कारण त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. परिणामी विमानाला इमर्जन्सी लॅण्डिंग करायची होती. दरम्यान अपघातानंतर विमानतळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद होतं.