एक्स्प्लोर
Akshardham Temple New Jersey : जगातील दुसरं मोठं मंदिर, अमेरिकेतील भव्य अक्षरधाम मंदिराचे डोळे दिपवणारे फोटो पाहा
Akshardham Temple, USA : अमेरिकेतील न्यू जर्सी येथील अक्षरधाम मंदिर भारताबाहेरील जगातील दुसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. या मंदिराची भव्यता पाहिल्यानंतर डोळे दिपून जातील.
Akshardham Temple inauguration in New Jersey
1/10

न्यू जर्सीमधील रॉबिन्सविले येथे BAPS स्वामीनारायण अक्षरधाम या भव्य मंदिराचं 8 ऑक्टोबरला लोकार्पण होणार आहे. हे भारताबाहेर जगातील दुसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर भव्य उद्घाटनासाठी सज्ज आहे. त्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.
2/10

अक्षरधाम मंदिराचा लोकार्पण सोहळा 30 सप्टेंबरपासून सुरू झाला असून परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत तो संपन्न होईल.
3/10

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील राष्ट्रप्रमुख आणि नेत्यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.
4/10

अलीकडेच, 29 सप्टेंबर 2023 रोजी लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू जर्सी येथील अक्षरधामच्या उद्घाटन सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला.
5/10

न्यू जर्सीमधील 12,500 स्वयंसेवकांनी 12 वर्षांत श्री स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर बांधलं आहे. या मंदिराचं बांधकाम 2011 ते 2023 या काळात झालं आहे.
6/10

बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधामचा 10 दिवसांचा भव्य लोकार्पण सोहळा 8 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार असून या दिवशी मंदिराचं औपचारिकरित्या उद्घाटन पार पडेल.
7/10

न्यू जर्सीमधील BAPS स्वामीनारायण अक्षरधाम हा हिंदू कला, वास्तुकला आणि संस्कृतीचा मैलाचा दगड मानला जात आहे.
8/10

या भव्य मंदिराचं बांधकाम पाहण्यासारखं आहे. मंदिराच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे.
9/10

मंदिरात दिव्यांची सुंदर आरासही करण्यात आली आहे. सूर्याची किरणे मंदिरावर पडल्यावर या भव्य मंदिरांचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.
10/10

न्यू जर्सी येथील अक्षरधाम मंदिराचा उद्घाटन सोहळा जगभरातील मोठ्या संख्येने भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
Published at : 03 Oct 2023 11:35 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























