एक्स्प्लोर
अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
ऐन उन्हाळ्यात शिमल्यासारखी स्थिती, अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
unseasonal rains in maharashtra
1/12

Unseasonal Rains : विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन मार्च महिन्यात आलेल्या अवकाळीमुळे मेहनतीने कष्ट करुन पिकवलेल्या सोन्यासारख्या धान्यावर पाणी सोडावं लागतंय की काय अशी भीती निर्माण झालेय..शेतीचं होणाऱ्या अतोनात नुकसानानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय.. केवळ अवकाळी पाऊसच नाही तर मोठ्या प्रमाणात गारपिटीचा वर्षावही होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
2/12

अवकाळीमुळे ऐन मार्च महिन्यात नद्यांना पूर आल्याचं दृश्य दिसंतय तर दुसरीकडे अजिंठा वेरुळ लेणीतील धबधबेही चक्क प्रवाहित झालेत जणू काही पावसाळा सुरु आहे. नंदूरबार, धुळे, परभणी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झालाय. काही ठिकाणी तर बर्फाची चादर पसरली आहे. यामुळे शिमला, जम्मू काश्मिरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळीमुळे शेतात पिकवायचं काय, कसं आणि कधी हा प्रश्नच शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय..त्यातच कर्मचाऱ्यांच्या संप सुरु असल्यानं नुकसानीचे पंचनामे कधी होणार हा प्रश्नही शेतकऱ्यांना पडलाय..
Published at : 17 Mar 2023 10:40 PM (IST)
आणखी पाहा























