एक्स्प्लोर
IND vs PAK: भारत-पाक थरारापूर्वी प्रेक्षकांसाठी संगीत मेजवानी; पाहा फोटो
India Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाचा महामुकाबला रंगत आहे. याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खास संगीत मैफिल आयोजित करण्यात आली होती.
IND vs PAK live singing performance
1/11

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आज विश्वचषक 2023 चा महामुकाबला खेळवला जात आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना रंगत आहे.
2/11

वर्ल्ड कप 2023 चा उद्घाटन सोहळा पार पडला नव्हता, मात्र भारत-पाकिस्तान सामन्याची सुरुवात प्रशस्त संगीत कार्यक्रमाने झाली.
3/11

अहमदाबाद स्टेडिअमवर भारत पाकिस्तान सामन्याआधी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यात भारताच्या नावाजलेल्या गायकांनी त्यांच्या सुरांची जादू दाखवली.
4/11

अरिजित सिंगच्या आवाजाने सारा आसमंत मंत्रमुग्ध झाला.
5/11

गायकांच्या रसील सुरांनी टीम इंडियाच्या चाहत्यांचा जोश चांगलाच बळावला.
6/11

अनेक पारंपरिक आणि देशभक्तिपर गाण्यांचंही सादरीकरण सामन्याआधी झालं.
7/11

सुखविंदर सिंह यांची गाणी क्रिकेट चाहत्यांनी एन्जॉय केली.
8/11

प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनीही आपल्या गाण्यांचं सादरीकरण केलं आणि आसमंत फुलवला.
9/11

टीम इंडियाच्या चाहत्यांनी या सुरेल मैफिलाचा आनंद घेतला.
10/11

सर्वांच्या नजरा होत्या त्या म्हणजे सामन्यावर, टीम इंडियाने टॉस जिंकताच पुन्हा एकदा भारतीयांच्या आशा वाढल्या.
11/11

अहमदाबादचा नरेंद्र मोदी स्टेडियम निळ्या रंगात न्हाऊन निघाला. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी उसळली.
Published at : 14 Oct 2023 02:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























