एक्स्प्लोर

Nashik Crime Bhushan Londhe Arrested: मोठी बातमी: सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पोलीस दिसताच 34 फुटांवरून उडी मारली अन्...

Nashik Crime Bhushan Londhe Arrested: दोन महिन्यांपासून फरार असलेल्या सातपूर ओरा बार गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढेला अखेर नाशिक पोलिसांनी अटक केलीय.

Nashik Crime Bhushan Londhe Arrested: सातपूरमधील ओरा बार गोळीबार प्रकरणानंतर तब्बल दोन महिन्यांपासून पोलिसांना चकवून फरार असलेला मुख्य आरोपी भूषण प्रकाश लोंढे (Bhushan Londhe Arrested) अखेर नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) जाळ्यात अडकला आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळ राबवलेल्या कारवाईदरम्यान भूषण लोंढेला ताब्यात घेतले. अटकेदरम्यान पोलिसांचा सुगावा लागताच भूषणने 34 फुटांवरून उडी मारत पलायनाचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून तो गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन दिवसात त्याला नाशिकमध्ये आणून न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण चव्हाण यांनी दिली आहे.

भूषण लोंढे हा नाशिक शहरातील कुख्यात लोंढे टोळीचा महत्त्वाचा सदस्य असून तो PL ग्रुपचा नेता आणि रिपाइंच्या गटाचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा आहे. प्रकाश लोंढे व त्यांचा मुलगा दीपक लोंढे हे दोघेही आधीच नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत. गोळीबार, खंडणी, दहशत निर्माण करणे, हाणामारी, जमीन व प्लॉट हडप करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

Bhushan Londhe Arrested: सातपूरच्या कार्यालयात आढळले होते भुयार

सातपूर परिसरात त्यांच्या कार्यालयातून सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांमुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासादरम्यान पोलिसांनी या कार्यालयावर टाकलेल्या धाडीत एक भुयारी मार्गही आढळून आला होता. तसेच नंदिनी नदीच्या काठावर महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यालयावरही संयुक्त बुलडोझर कारवाई करून तो ढासळण्यात आला होता.

Bhushan Londhe Arrested: अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता

नोंदीवर असणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी संघटित गुन्हेगारीचा प्रतिबंध करण्यासाठी लोंढे टोळीविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली होती. टोळीचा मोरख्या प्रकाश लोंढे व त्याचे साथीदार न्यायालयीन कोठडीत असताना भूषण लोंढे मात्र पोलिसांना चकवून फरार होता. सातपूर, अंबड, गंगापूर आदी पोलीस ठाण्यांत त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर हाणामारी, प्रॉपर्टी हडपणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी नाशिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुप्त माहिती गोळा करत मोहीम राबवली. अखेर नेपाळ सीमेजवळ तो मिळून आला आणि त्याला अटक करण्यात यश आले. भूषण लोंढेच्या अटकेमुळे ओरा बार गोळीबार प्रकरणासह त्याच्या टोळीशी संबंधित अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही वर्षात वाढत चाललेल्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

आणखी वाचा 

Nashik Crime Prakash Londhe: विदेशी दारूच्या बाटल्या, कुऱ्हाड, चाकू....; लोंढेच्या 'गुप्त भुयारा'तून नाशिक पोलिसांना काय-काय सापडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Vijay Pandhare On Ajit Pawar Sinchan Scam: सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता जलसिंचन विभागाच्या तत्कालीन मुख्य अभियंतांचा खळबळजनक दावा
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report
Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Vijay Pandhare On Ajit Pawar Sinchan Scam: सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता जलसिंचन विभागाच्या तत्कालीन मुख्य अभियंतांचा खळबळजनक दावा
सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा युती सरकारवर गंभीर आरोप; आता तत्कालीन अभियंतांचा खळबळजनक दावा
Jalgaon Crime : कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह 3 किलो सोने अन् 8 किलो चांदी; पावत्या नसल्याने मुद्देमाल जप्त, जळगावात स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई
निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; कारमध्ये आढळली तब्बल 29 लाख रोकडसह सोने-चांदी, पावत्या नसल्याने संशय बळावला
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका... तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली ?
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका... तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, काय म्हणाली ?
Ladki Bahin Yojana : काँग्रेसने लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला; नागपुरात घराबाहेर पत्र ठेवून पळाले, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
काँग्रेसने लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला; नागपुरात घराबाहेर पत्र ठेवून पळाले, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, महाराजांचा सिनेमा म्हणून मी गप्प..दिग्पाल लांजेकरांवर मनसे नेता संतापला
काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, महाराजांचा सिनेमा म्हणून मी गप्प..दिग्पाल लांजेकरांवर मनसे नेता संतापला
Embed widget