एक्स्प्लोर
परदेशी पाहुणा 'सीगल' भारतात दाखल, कल्याण खाडी पात्रात मनसोक्त विहार करतात थवे, पक्षीप्रेमींची गर्दी
Migratory Birds Seagulls: अमेरिका आणि युरोपातले सिगल पक्षी भिवंडी कल्याण सीमेवरील खाडीत, दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन सिगल पक्षी खाडीत येतात, खाडी पुलावर पक्षी बघणाऱ्यांची गर्दी.
Migratory Birds Seagulls
1/12

भिवंडी-कल्याण सीमेवरील खाडीवर सध्या परदेशी सीगल पक्षी या पाहुण्यांचे आगमन झालंय.
2/12

पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असं मोहक रूप या पक्ष्यांचं असतं.
3/12

अमेरिका आणि युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या सीगल पक्षांनी भिवंडी आणि कल्याण सीमेवरील खाडीवर मुक्काम ठोकला आहे.
4/12

अमेरिका, युरोप येथून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी दरवर्षी याचवेळी भारतात दाखल होतात.
5/12

पुढचे दोन महिने हे पक्षी इथेच मुक्काम करतील आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा ते माघारी परततील.
6/12

अथांग पसरलेल्या खाडी पात्रात मनसोक्त विहार करणाऱ्या पांढऱ्या शुभ्र सीगल पक्षांचे थवे उडताना दिसत आहेत.
7/12

सीगल पक्षांच्या मुक्त विहाराची विलोभनीय दृश्य सध्या यामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिसत आहेत.
8/12

सीगल पक्षांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमी खाडी पुलावर गर्दी करत आहेत.
9/12

सीगल पक्षी पाहण्यासाठी, त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कल्याणकर, पक्षीप्रेमी आणि निसर्ग छायाचित्रकारांची खाडी पुलावर मोठी गर्दी होतेय.
10/12

या पक्षांचं मुख्य खाद्य छोटे मासे, खेकडे आहे.
11/12

पण येथील खाडी पुलावर स्थानिकांकडून या सीगल पक्षांना शेव, चिवडा, ब्रेड, पाव तर लहान मुलांकडून चक्क कुरकुरे खायला घातले जात आहेत.
12/12

सीगल पक्षांना कोणीही शेव, चिवडा, फरसाण खायला देऊ नये, असं आवाहन पक्षीप्रेमींकडून देण्यात आलं आहे.
Published at : 07 Feb 2023 08:55 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























