एक्स्प्लोर
Ambernath Fire: अंबरनाथमध्ये अभ्यासिका आगीत जळून खाक; अग्निशमन दलाची गाडी वेळेत न पोहोचल्याचा स्थानिकांचा आरोप
अंबरनाथमध्ये अभ्यासिका आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी वेळेत न पोहोचल्यामुळे अभ्यासिका पूर्णपणे भस्मसात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
Ambernath Fire
1/9

अंबरनाथमध्ये अभ्यासिका आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
2/9

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी वेळेत न पोहोचल्यामुळे अभ्यासिका पूर्णपणे भस्मसात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
3/9

अंबरनाथ पूर्वेतील कानसई दत्त मंदिर परिसरात मनोहर कला सांस्कृतिक केंद्राच्या आवारात ही अभ्यासिका होती.
4/9

या अभ्यासिकेत परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी येऊन अभ्यास करायचे. या अभ्यासिकेला रविवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागली.
5/9

यावेळी स्थानिकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला, मात्र अग्निशमन दलाची गाडी उशिरा आली आणि तोपर्यंत संपूर्ण अभ्यासिका आगीत जळून खाक झाली.
6/9

अंबरनाथ नगरपालिकेचं अग्निशमन केंद्र अंबरनाथ पश्चिमेच्या चिंचपाडा परिसरात आहे.
7/9

हा भाग शहराच्या एका टोकाला असून तिथून अंबरनाथ पूर्वेत कुठेही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तासाचा अवधी लागतो.
8/9

त्यामुळे अशा आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप कानसई परिसरातील स्थानिक रहिवासी आणि भाजपचे पदाधिकारी संजय आदक यांनी केला आहे.
9/9

त्यानुसार लवकरच शिवमंदिर परिसरातील मैदानावर अग्निशमन दलासाठी तात्पुरतं शेड उभारून उपकेंद्र सुरू करणार असल्याचं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Published at : 25 Apr 2023 11:38 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















