एक्स्प्लोर
Audi India | ऑडी इंडियाकडून भारतातील पहिली इलेक्ट्रिक सुपरकार लाँच! पहा फोटो
संग्रहित छायाचित्र
1/6

जर्मन लक्झरी कार निर्माता ऑडीने आज भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत फोर-डोर कूप्स-ऑडी ईट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ईट्रॉन जीटी या दोन पूर्णपणे इलेक्ट्रिक कार लाँच केल्या. ऑडी ई-ट्रॉन जीटी पूर्णपणे नवी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असून ती स्पोर्टीनेस, एक्सक्लूझिविटी आणि आरामदायी आहे. ऑडी आरएस ई ट्रॉन जीटी कोणत्याही इतर आरएसपेक्षा वेगळी आहे. हे ऑडीचे आतापर्यंतचे सर्वात पावरफुल सीरीज उत्पादन आहे.
2/6

ऑडी ई-ट्रॉन जीटीमध्ये 390 किलोवॅटची पॉवर असून ती 4.1 सेकंदात ताशी 0-100 किमीचा सुपरफास्ट वेग धारण करते. तर 475 किलोवॅट आरएस ई-ट्रॉन जीटी केवळ 3.3 सेकंदात हा वेग धारण करते. ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी ई-ट्रॉन जीटी मध्ये 83.7/93.4 केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी आहे. ती ऑडीआरएस ई-ट्रॉन जीटीसाठी 401-481 किमी आणि ऑडी ई-ट्रॉन जीटी (डब्ल्यूएलटीपी कम्पाइंड) साठी 388-500 किमीची रेंज प्रदान करते.
3/6

270 किलोवॅट डीसी चार्जिंग पॉवर आणि 800 व्होल्ट तंत्रज्ञानासह नेक्स्ट लेवल हाय पॉवर चार्जिंग, सुमारे 22 मिनिटात 5% ते 80% पर्यंत चार्ज होते. ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ई - ट्रॉन जीटी अनुक्रमे 1,79,90,000 आणि 2,04,99,000 रुपयांत (एक्स-शोरूम) भारतीय बाजारात उपलब्ध आहे.
4/6

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लो म्हणाले, "आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आम्ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक सुपरकार लाँच करत आहोत. जुलै 2021 नंतर हे आमचे चौथे आणि एकूण पाचवे इलेक्ट्रिक वाहन लाँच झाले आहे. ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई- ट्रॉन जीटी ऑडीचे अल्टिमेट ब्रँडशेपर आहेत. प्रगती करणाऱ्या प्रीमियम ब्रँडच्या रुपात ऑडीचा निरंतर विकास त्यांच्याद्वारे अभिव्यक्त होतो. हे दोन फोर-डोर कूप डीएनए आणि प्रीमियम मोबिलिटीच्या भविष्याला आकार देण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहेत."
5/6

ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटीला स्थिरतेसह स्पोर्टीनेस आणि आरामाच्या विशिष्ट ग्रॅन टुरिझ्मो वैशिष्ट्यांना समाविष्ट करूनच तयार करण्यात आले आहे. 'मोनोपोस्टो' संकल्पनेपासून प्रेरित होऊन इंटेरिअर ड्रायव्हरवर दृढतेने लक्ष केंद्रित करते. इन्स्ट्रुमेंट पॅनल, यात ऑडी व्हर्चुअल कॉकपिट आहे.
6/6

ई-ट्रॉन हब Audi.in वेबसाइट आणि ऑडी कनेक्ट अॅपवर उपलब्ध एक विशेष टॅब आहे. ते तुम्हाला ऑडी ई-ट्रॉनचे अनेक फंक्शन आणि फीचर्ससाठी मार्गदर्शन करते. कार समजून घेण्यासाठी जवळचे चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी तुमचे मार्गदर्श करण्यापासून ई-ट्रॉन हब असंख्य गोष्टींची मदत करते. ऑडी ईव्हीचे मालक ऑडी ई-ट्रॉनसह कम्पॅटेबल सर्व चार्जिंग स्टेशनचा रेफरन्स 'माय ऑडी कनेक्ट' अॅपवर प्राप्त करू शकतात. इलेक्ट्रिक वाहन टेक्नोलॉजीला वेगाने वापरणे आणि प्रसाराच्या दृष्टीने हे उपकरण ऑडी इंडिया ब्रँडची वेबसाइट आणि अॅपवरही उपलब्ध आहे.
Published at : 22 Sep 2021 04:48 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग


















