एक्स्प्लोर
Ujani dam : उजनीत 10.68 TMC गाळ, धरणातील गाळ काढण्याचा प्रकल्प रेंगाळला
गाळ निष्कासन समितीचे अध्यक्षपद रिक्त असल्यानं उजनी धरणातील (ujani dam) गाळ काढण्याचे काम रखडले आहे
ujani dam
1/10

गाळ निष्कासन समितीचे अध्यक्षपद रिक्त असल्यानं उजनी धरणातील (ujani dam) गाळ काढण्याचे काम रखडले आहे.
2/10

निरी या संस्थेने केलेल्या तपासणीनुसार धरणात जवळपास 10.68 TMC गाळ असल्याची माहिती आहे. हा गाळ काढल्यावर कमीत कमी 10 TMC पाणीसाठा वाढणार आहे.
3/10

पाण्याचा वापर दुष्काळी भागासाठी करता येणं शक्य होणार आहे. उजनी धरणाच्या निर्मितीपासूनच धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठत असल्यानं क्षमतेएवढा पाणीसाठा धरणात साठवला जात नाही.
4/10

उजनी धरणावर सोलापूर महापालिकेसह अनेक नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.
5/10

अनेक औद्योगिक वसाहतींना उजनी धरणातून पाणीपुरवठा होत असल्यानं शेकडो उद्योग सध्या सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यात सुरु आहेत. मात्र, सध्या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे.
6/10

गाळ काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेण्याची गरज असल्यानं याचे टेंडर बनवण्यासाठी 18 जुलै 2022 रोजी एक समिती गठीत करण्यात आली होती
7/10

उजनीतून गाळ काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्या येणार असल्यानं या समितीला निविदेचा मसुदा आणि अटी शर्ती ठरवण्याचे काम देण्यात आले होते.
8/10

समितीच्या अध्यक्षपदी असलेले अधिकारी बढतीवर गेल्यानं हे काम सध्या थंडावले आहे. उजनीत असलेली गाळ आणि वाळूचे सर्वेक्षण करण्याचे काम 2019 मध्ये मेरी या नाशिक येथील संस्थेनं केलं होतं.
9/10

अहवालानुसार उजनीत 10.68 TMC एवढा मोठ्या प्रमाणात गाळ असल्याचा अहवाल देण्यात आला होता. यानंतर हा गाळ आणि वाळू काढण्यासाठी मानक निविदेवर काम सुरु आहे.
10/10

उजनी धरणातील गाळ काढला तर 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीला पाणी मिळणार
Published at : 26 Feb 2023 02:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
