एक्स्प्लोर
सांगलीत पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ; मिळाला उच्चांकी दर
Sangli News : सांगलीत पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ करण्यात आला. सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे काढण्यात आले.

Sangli News
1/10

सांगलीत पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ झाला.
2/10

यावेळी 11 हजार 500 इतका मिळाला उच्चांकी दर मिळाला.
3/10

जागतिक हळदीची बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे.
4/10

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे मराठी नववर्षात सौदे काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.
5/10

सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे काढण्यात आले.
6/10

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव महेश चव्हाण,प्रसिद्ध हळद व्यापारी मनोहर सारडा यासह मोठ्या संख्येने व्यापारी आणि शेतकरी या सौदे प्रसंगी उपस्थित होते.
7/10

आज पार पडलेल्या या हळद सौद्यांमध्ये 11 हजार 500 इतका सरासरी उच्चांक दर मिळाला .
8/10

कर्नाटकच्या रायबाग येथील शेतकऱ्यांच्या राजापुरी हळदीला हा दर मिळाला.
9/10

पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे पूजन करून सौद्यांचा शुभारंभ झाला.
10/10

सांगलीच्या मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेठ हळदीची वर्षाला 17-18 लाख क्विंटल आवक होते
Published at : 22 Mar 2023 12:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion