एक्स्प्लोर
Photo : मिरजमध्ये अतिक्रमण पाडण्यावरून दोन गटात वाद
सांगलीच्या मिरजमध्ये (Miraj) जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली.
Sangli Miraj News
1/10

सांगलीच्या मिरजमध्ये (Miraj) जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
2/10

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Mla Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी अतिक्रमण पाडल्याने वाद निर्माण झाला आहे
3/10

वादग्रस्त जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागला आहे. महापालिकेनं नोटीस दिल्यानं हे अतिक्रमण हटवल्याचा दावा ब्रम्हानंद पडळकरांनी केला आहे. अतिक्रमण हटवण्याला गाळ्यातील भाडेकरुंनी विरोध केला आहे. यावेळी दोन गटात राडा झाला.
4/10

जेसीबीने हॉटेल, दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर त्या गाळ्यामधील भाडेकरूंनी या घटनेला विरोध केला. जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज रोडवर बसस्थानकाशेजारी घडली.
5/10

घटनास्थळी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे.
6/10

जेसीबीच्या काचांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी ही जागा घेतल्याचा दावा केला जात आहे. या जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागल्याचे सांगितले जात आहे.
7/10

हापालिकेने अतिक्रमण काढाची नोटीस दिली होती. त्यानंतर हे गाळे पाडण्यात आले आहेत. पाडापाडी सुरु असताना गाळेधारक मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.
8/10

वाद चिघळू नये म्हणून पोलिसांना योग्य ती खबरदारी घेतली आहे. मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
9/10

याप्रकरणी गाळेधारक मिरज पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
10/10

गाळेधारकांनी पाडापाडी करण्यास विरोध केला. यातून दोन गटात वाद झाला. यामध्ये गाळेधारकांनी जेसीबीच्या कांचा फोडल्या आहेत. सध्या काम थांबले आहे.
Published at : 07 Jan 2023 10:07 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























