एक्स्प्लोर
Run De Bharti marathon : सांगलीत भारती विद्यापीठाची 'रन दे भारती' मॅरेथॉन संपन्न
Bharti University Run De Bharti marathon : सांगलीत (Sangli News) भारती विद्यापीठाची 'रन दे भारती' मॅरेथॉन पार पडली. पंधराशेहून अधिक स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.

Run De Bharti marathon
1/11

सांगलीत भारती विद्यापीठाकडून 'एक पाऊल आरोग्याकडे' या उद्देशाने 'रन दे भारती' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
2/11

मॅरेथॉनमध्ये पंधराशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
3/11

भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आणि भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसनिमित्त ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
4/11

या मॅरेथॉनमध्ये 5 किमी, 10 किमी आणि 21किमी असे तीन टप्पे करण्यात आले होते.
5/11

मॅरेथाॅनमध्ये 18 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यत पुरुष, महिला, युवती सहभागी झाले होते.
6/11

मॅरेथॉनमध्ये सर्व गटातील नागरिकांसाठी 2 किमीची 'थीम रन' ही एक नवीन संकल्पना नियोजित केली होती.
7/11

पहाटे पाच वाजता भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावरुन मॅरेथाॅनला सुरवात झाली.
8/11

5 किमीची स्पर्धा भारती हॉस्पिटल ते विश्रामबाग चौक व तेथून परत भारती हॉस्पिटल अशी होती. 10 किमीची स्पर्धा भारती हॉस्पिटल ते राममंदीर चौक व परत भारती हॉस्पिटल अशी तर 21 किमीची स्पर्धा भारती हॉस्पिटल ते गांधी चौक, मिरज ते विश्रामबाग - आयर्विन पुलावरुन परत भारती हॉस्पिटल अशी पार पडली.
9/11

प्रत्येक वयोगटानुसार पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले विजेत्यांना असून रोख पारितोषिकेही दिली गेली.
10/11

मॅरेथॉन मार्गावर खबरदारी म्हणून स्वयंसेवक, हायड्रेशन सपोर्ट, कार्डियाक रुग्णवाहिकेसह आपत्कालिन वैद्यकीय सेवा पुरवली गेली.
11/11

शिवाय भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धेकासाठी रिकव्हरीचीही सोय करण्यात आली होती.
Published at : 22 Jan 2023 11:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
नाशिक
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
