एक्स्प्लोर
Maharashtra Mansoon : यंदाच्या पावसाळ्यात 'या' जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्या मोकळा श्वास घेऊन वाहणार..
Maharshtra Rivers : गेल्या वर्षी पासूनच या पाचही प्रमुख नद्यांमधील गाळ उपसा, नद्यांची रुंदी,खोली आणि नद्यांतील प्रवाहातील येणारे अडथळे दूर केल्याने या पाचही नद्या या पावसाळ्यात मोकळा श्वास घेऊन वाहणार
Maharashtra Mansoon
1/11

गेल्या काही वर्षांमध्ये कोकणातील अतिवृष्टीचे प्रमाण हे वर्षानुवर्षे वाढतच आहे.पावसाळा म्हटलं तर कोकणातल्या दऱ्याखोऱ्यातील सह्याद्रीच्या भागात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं.त्यातच कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी सोसायटीच्या वाऱ्यासह वादळीवारा,अतिवृष्टी,ढगफुटी यामुळे सारं कोकण उध्वस्त करून जातं.त्यामुळे कोकणकरांना पावसाळ्यामध्ये एक धास्ती लागलेली असते.अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती आणि सोसायटीच्या वारासह येणाऱ्या वादळ याचा प्रत्यय दोनच वर्षांपूर्वी कोकणकरांना आलेला आहे.दोन वर्षांपूर्वी कोकणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यात कोकणातील गावांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.विशेष करून रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात किनारपट्टीवरच्या भागात आणि शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या महापुराचे पाणी शहरात शिरल्याने तिथल्या बाजारपेठेचे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं
2/11

विशेषता करून रत्नागिरी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूणची वशिष्टी,संगमेश्वरची शास्त्री,रत्नागिरीची बावनदी,लांजा मधील चांदोरायची काजळी नदी आणि राजापूर मधील अर्जुना नदी या पाच नद्या पावसाळ्यात नेहमी चर्चेत असतात.याचे एकमेव कारण म्हणजे पावसाळ्यात या तिन्ही नद्या या प्राची नद्या तुतडी वरून वाहतात
Published at : 17 Jun 2023 05:16 PM (IST)
आणखी पाहा























