Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण, चांदी 2477 रुपयांनी स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Silver Rate: गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे.

Gold नवी दिल्ली : भारतातील सराफा बाजार असो, मल्टी कमोडिटी एक्सचेंज असो की आंतरराष्ट्रीय बाजार असो सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं या वर्षी पाहायला मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तेजी सुरु होती. काल चांदीच्या दरानं उच्चांक गाठल्यानंतर आज गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्याचा निर्णय घेतल्यानं चांदीचे दर 2477 रुपयांनी कमी झाले. तर, सोन्याच्या दरात देखील 459 रुपयांची घसरण झाली. चांदीचा जीएसटीशिवायचा दर 175713 रुपये किलो आहे. तर, जीएसटीसह चांदीचा दर 180984 रुपये प्रति किलो इतका आहे.
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात घसरण
चांदीचा यापूर्वी जीएसटीशिवायचा दर 178190 रुपये किलो इतका होता. तर, सोन्याचा दर 128214 रुपयांवर पोहोचला होता. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 127755 रुपये झाला आहे. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा दर 131587 रुपये 10 ग्रॅम इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर 120534 रुपये आहे. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 98690 रुपयांवर आला आहे.
17 ऑक्टोबरला सोन्याच्या दरानं 130874 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 3119 रुपयांनी कमी आहे. चांदीचा दर 3 डिसेंबरच्या उच्चांकाच्या तुलनेत 178684 रुपयांवरुन 2971 रुपयांनी कमी झाला आहे.
23 कॅरेट सोन्याच्या दरात आज 458 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. एका तोळ्याचा दर 127243 रुपये इतका आहे. जीएसटीसह या सोन्याचा दर 131060 रुपये इतका असून हा दर मेकिंग चार्जेस शिवायचा आहे.
22 कॅरेट सोन्याच्या दरात 420 रुपयांची घसरण होऊन ते 117024 रुपयांवर पोहोचले. जीएसटीसह सोन्याचा दर 120534 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 345 रुपयांची घसरण होऊन ते 95816 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह याचा दर 98690 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 14 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 268 रुपयांची घसरण झाली असून ते74737 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह याचा दर 76979 रुपये इतका आहे.
2025 मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळं सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. सोन्याचे दर 31 डिसेंबरला 75000 रुपयांवर होते. तर, चांदीचे दर 86000 रुपयांवर होते. चांदीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरवठा कमी झाल्यानं आणि औद्योगिक वापरासाठी चांदीचा वापर वाढल्यानं चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं होतं.
दरम्यान, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून दिवसभरात दोनवेळा दर जाहीर केले जातात. दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता आयबीजेएकडून दर जाहीर केले जातात. हे दर आणि प्रत्यक्ष तुमच्या शहरातील दर यामध्ये फरक असू शकतो. आयबीजेएकडून जाहीर केले जाणारे दर मेकिंग चार्जेस शिवायचे असतात.
























