एक्स्प्लोर
Bacchu Kadu : अपना भिडू बच्चू कडू! बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार? पुण्यातील बॅनरची चर्चा
राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
Feature Photo
1/8

राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
2/8

मानहानीच्या खटल्यात सुरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे.
3/8

पण 2 वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याचे पडसाद शुक्रवारी देशभर उमटल्याचे पाहिला मिळाले. तसेच देशातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला.
4/8

दरम्यान आता याचे पडसाद पुण्यात पाहायला मिळत आहेत. पुण्यात आज शनिवारी राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
5/8

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
6/8

आता त्यांची आमदारकी कधी रद्द होणार असा सवाल बॅनर वरून विचारला आहे.
7/8

"अपना भिडू! बच्चू कडू! आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपुर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.
8/8

त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान" असं बॅनरवर लिहिले आहे.
Published at : 25 Mar 2023 02:47 PM (IST)
आणखी पाहा























