एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पुण्यात, गेला पाण्यात; पावसाचे आगमन दणक्यात
पुण्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी पावसामुळे सगळीच दाणादाण उडाली होती. पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत होऊन अनेकाचं मोठं नुकसानही पावसामुळे झालं होतं.
Pune rain disturbed CM programe
1/7

पुण्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी पावसामुळे सगळीच दाणादाण उडाली होती. पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत होऊन अनेकाचं मोठं नुकसानही पावसामुळे झालं होतं.
2/7

आता, 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं दिसून आलं. काही मिनिटांच्या पावसामुळे रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी साचले होते.
3/7

पुणे शहरातील हडपसर भागात मुसळधार पाऊस पडल्याने येथील भागात पाणी साचल्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर पाणी फेरल्याचं चित्र निर्माण झालं.
4/7

येथील भागात श्रीराम शिल्पाच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री आले होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे कार्यक्रमस्थळी असलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसून आल्या.
5/7

पुण्यातील लाडकी बाहीण योजनेच्या कार्यक्रमांनंतर विविध ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भेटी दिल्या. यावेळी, नाना भानगिरे यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या रामाच्या पुतळ्याच अनावरण त्यांच्याहस्ते करण्यात आलं.
6/7

मोहम्मद वाडीत प्रभू श्रीराम यांच्या शिल्पाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री आले, पण पावसामुळे कार्यक्रमस्थळी चांगलंच पाणी साचल्याचं दिसून आलं.
7/7

दरम्यान, पावसानंतरही मुख्यमंत्र्यांनी येथील पुतळ्याचे अनावरण करुन पुणेकरांशी संवाद साधला
Published at : 17 Aug 2024 08:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























