एक्स्प्लोर
Pune: हॉर्न का वाजवला? पुण्यात मद्यधुंद टोळक्याची जोडप्याला मारहाण, गाडीही फोडली; पुण्याच्या पाषाण सर्कलवर काय घडलं?
पुण्यात आजकाल किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. पाषाण सर्कलमध्ये रात्री घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ होती.
Pune Crime
1/6

पुण्याच्या पाषाण भागात नशेत धुंद असलेल्या पाच जणांच्या टोळक्याने केवळ हॉर्न वाजवला म्हणून एका पती-पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2/6

हा प्रकार पाषाण सर्कल येथे घडला असून, या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3/6

माहितीनुसार, पीडित दाम्पत्याने वाहतूक कोंडीमुळे वाहनाचा हॉर्न वाजवला होता. या गोष्टीवरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली आणि त्यानंतर हातघाईवर येत दोघांना बेदम मारहाण केली.
4/6

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तक्रार दाखल होताच तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
5/6

हॉर्न का वाजवला म्हणत टोळक्यांनी घातलेल्या राड्यात पती पत्नीला मार लागला असून त्यांच्या गाडीच्या काचा फूटल्या आहेत. टोळक्याने भररस्त्यात गाडीत घूसत हा प्रकार केल्याची माहिती आहे.
6/6

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Published at : 22 Apr 2025 11:46 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















