एक्स्प्लोर
Pune Accident News: पुण्यात कुख्यात नवले ब्रीजजवळ अपघात; मुंबईला जाणाऱ्या भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी, थेट चारचाकी वाहनांवर धडकला अन्...
Pune Accident News: कात्रजकडून मुंबईला जाणाऱ्या भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाले, त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.
Pune Accident News
1/6

पुण्यातील नवले ब्रीजजवळ अपघात झाला आहे. काल रात्री नवले ब्रीजजवळ एका ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला, ज्यात काही लोक जखमी झाले आहेत.
2/6

कात्रजकडून मुंबईला जाणाऱ्या भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाले, त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.
3/6

ट्रकचे ब्रेक निकामी होऊन चारचाकी वाहनांना धडकला. अपघातात अनेक चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहेत.
4/6

घटनेत कोणीही जखमी नाही, काही वेळापूर्वी ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
5/6

ट्रक चालक दारुच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
6/6

पोलिस घटनेचा तपास करत आहेत, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
Published at : 06 Aug 2025 01:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























