एक्स्प्लोर
पिंपरी चिंचवडच्या पावसाचं रौद्ररूप, रस्त्यावरून धावणारी 3-4 वाहनं ओढ्याच्या प्रवाहात ओढली गेली, पहा भयावह Photo
काल रात्रीची ही भयाण परिस्थिती मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. रात्रीच्या अंधारात ओढ्याच्या प्रवाहात ओढल्या गेलेल्या वाहनांमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली
Pimpri Chinchwad Rain
1/7

पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावर धावणारी वाहनं, ओढ्याच्या प्रवाहाने ओढून घेतली.
2/7

4 ते 5 वाहनांतील दहा ते बारा जणांना स्थानिकांनी सुखरुप बाहेर काढून, जीवदान दिलं. चऱ्होलीतील भोसले नगरच्या ओढ्यात काल रात्रीची ही भयाण परिस्थिती मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली.
3/7

सायंकाळी साडे सहा नंतर आलेल्या तुफान पावसामुळं चऱ्होलीच्या ओढ्याला पूर आला. मुख्य रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं.
4/7

तोपर्यंत काळकुट्ट अंधार पडल्यानं तिथून जाणाऱ्या वाहन चालकांना परिस्थितीचा अंदाज येत नव्हता.
5/7

स्थानिकांनी त्यांच्या परीने परिस्थितीची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला खरा पण काही वाहन चालकांच्या लक्षात ही बाब आली नाही. त्यामुळं 4 ते 5 वाहनं ओढ्याच्या प्रवाहाने ओढून घेतली.
6/7

त्या वाहनांतील 10 ते 12 जणांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढलं. याचं ठिकाणी गेल्या वर्षी ही एक वाहन अडकलं होतं, त्यावेळी स्थानिक तरुण योगेश भोसलेने जीवाची बाजी लावत त्यांना जीवदान दिलं होतं.
7/7

या ओढ्यात वारंवार पुरजन्य परिस्थिती निर्माण होते, त्यामुळं प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांकडून केली जातीये.
Published at : 14 Jun 2025 11:40 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























