एक्स्प्लोर
Pune PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यापासून साकारले भव्य पोट्रेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यापासून भव्य पोट्रेट साकारले आहेत.

pune news
1/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते आणि जय भवानी सहकारी बँकेचे संचालक किशोर उर्फ राजेंद्र तरवडे यांच्या वतीने मोदी यांचे धान्यापासून 18बाय 10आकाराचे पोट्रेट साकारण्यात आले आहे.
2/8

कालिका माता मंदिर, तपकिर गल्ली, बुधवार पेठ,पुणे येथे या पोट्रेटचे अनावरण आज करण्यात आले.
3/8

अलीकडे रांगोळीच्या माध्यमातून अनेकदा पोट्रेट साकारले जातात, मात्र हे धान्यापासून साकारलेले पहिले पोट्रेट असून 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान हे पोट्रेट पुणेकरांना विनामूल्य बघता येणार आहे.
4/8

धान्याचा वापर करून निर्माण केलेले हे पोट्रेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचवायचं असल्याचं आयोजक म्हणाले.
5/8

भव्य पोट्रेट गणेश खरे, सुधीर शिंदे आणि त्यांच्या टीमने साकारले असून त्यांना यासाठी सुमारे ३ कलाकार काम करत होती एकूण 16 तासांचा कालावधी लागला आहे.
6/8

या पोट्रेटमध्ये गहू, तीन प्रकारचे तीळ, ज्वारी, डाळ, हळीव, मूग, मटकी यांचा वापर करण्यात आला असून एकूण धान्य पन्नास किलो पेक्षा जास्त असल्याचेही तरवडे यांनी सांगितले.
7/8

तसेच जास्तीत जास्त पुणेकरांनी हे पोट्रेट बघायला यावे आणि या अभिनव कलेला दाद द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
8/8

अनोख्या पद्धतीने मोदींना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Published at : 15 Sep 2023 07:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
