एक्स्प्लोर
ज्ञानेश्वर माऊलींसाठी 1 किलो सोन्याचा मुकूट अर्पण; 3D तंत्रत्रान, कोरीव नक्षीकाम, किंमत किती?
भाविकांकडून नेहमीच आपली श्रद्धा व्यक्त करताना श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानी दान अर्पण केलं जातं. अनेकदा हे दान मौल्यवान वस्तूंच्या स्वरुपातही असतं.
Dyaneshwar mauli alandi golden mukut
1/8

भाविकांकडून नेहमीच आपली श्रद्धा व्यक्त करताना श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानी दान अर्पण केलं जातं. अनेकदा हे दान मौल्यवान वस्तूंच्या स्वरुपातही असतं. महाराष्ट्रातील विविध तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांकडून दर्शन घेत दान अर्पण केलं जातं.
2/8

आळंदीची भक्ती, कला आणि तंत्रज्ञान यांचा अद्वितीय संगम असलेल्या एका अलंकारिक मुकुटाचं आज आळंदीतील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करण्यात आलं.
3/8

नांदेड येथील भारत रामिनवार आणि मिरा रामिनवार या भक्तदांपत्यानं सुमारे 1 कोटी रुपये किंमतीचा आणि 1 किलो शुद्ध सोन्यापासून बनवलेला हा मुकुट "ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी" येथे अर्पण केला.
4/8

या मुकुटाची निर्मिती सुप्रसिद्ध पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. यांनी केली असून, चार महिन्यांच्या अथक परिश्रमातून तो साकारला आहे. पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची सूक्ष्म कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाचा सुंदर समन्वय यामध्ये पाहायला मिळतो.
5/8

मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण आदी मंगल धार्मिक प्रतीकांची कलात्मक मांडणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वारकरी परंपरेशी नातं असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभावाने घडवला असून, त्यामुळे त्याला अधिक पावित्र्य लाभले आहे.
6/8

या विशेष प्रसंगी योगी निरंजननाथ (प्रमुख विश्वस्त), डॉ. भावार्थ देखणे (विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख), ज्ञानेश्वर वीर (व्यवस्थापक) आणि ॲड. राजेंद्र उमाप (विश्वस्त ) हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत माऊलींना हा अलंकार भक्तिपूर्वक अर्पण करण्यात आला.
7/8

हा मुकुट विशेष धार्मिक प्रसंगी माऊलींना परिधान करण्यात येणार असून, भाविकांसाठी तो श्रद्धा, भक्ती आणि अभिमानाचं प्रतीक ठरेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं पारंपरिक श्रद्धेची अशी साजेशी मांडणी ही काळाशी सुसंगत अशी भक्तीची अभिव्यक्ती म्हणावी लागेल.
8/8

रामिनवार दांपत्याच्या या अद्वितीय अर्पणामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सेवेत जोडलेली ही कलाकृती भाविकांच्या मनात अढळ स्थान मिळवेल, यात शंका नाही.
Published at : 18 Jun 2025 08:55 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















