Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार? युतीची घोषणा करणार? Special Report
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेसेना आणि मनसेचे कार्यकर्ते ज्याची आतूरतेनं वाट बघतायत... तो क्षण जवळ आलाय... संजय राऊत म्हणतात ते खरं असेल, तर उद्याच ठाकरेंच्या महायुतीची घोषणा होईल.. त्यासाठी आज दिवसभर बैठकांचं जोरदार सत्र सुरू होतं... संजय राऊतांपासून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई ही मंडळी मातोश्री आणि शिवतीर्थादरम्यान धावपळ करत होते... यातून दोन्ही पक्षांच्या हाती नेमकं काय लागलंय, पाऊयात
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा शब्द पडू द्यायचा नसेल...
तर ठाकरे बंधूंना मंगळवारचा सूर्य उगवताच युतीची घोषणा करायला हवी...
कारण २३ डिसेंबरपासून, म्हणजेच उद्यापासून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात होणार आहे...
आता मंगळवारच्या सूर्याला कोणकोणत्या राजकीय घडामोडी पाहायला मिळताहेत हे लवकरच कळेल..
मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत आणि मनसेच्या बाळा नांदगावकरांसाठी सोमवार बऱ्यापैकी दगदगीचा होता
आधी संजय राऊत राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले...
मग बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले...
तीन एक तासाच्या चर्चेनंतर मनसे नेत्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या घराचा रस्ता धरला
आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एवढ्या चकरा माराव्या लागण्याचं कारण म्हणजे काही जागांवरचा तिढा
All Shows

































